Shreyas Iyer Doubtful For ODI World Cup 2023 : दोन दिवसांपूर्वी आयसीसीने भारतात होणाऱ्या विश्वचषक वेळापत्रकाची घोषणा केली. प्रत्येक संघाला वर्ल्ड कपच्या तयारीसाठी 100 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय. यजमान भारताला विश्वचषकाआधीच मोठा धक्का बसला आहे. मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीपासून सावरण्याची शक्यता कमीच दिसतेय. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे विश्वचषकात खेळण्याची शक्यता कमी असल्याचे काही रिपोर्ट्स आले आहेत. अय्यरची दुखापत गंभीर असून तो अद्याप रिकव्हर झालेला नाही. 


पाठदुखीमुळे श्रेयस अय्यर याला सर्जरी करावी लागली होती. ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशिया चषकापूर्वी श्रेयस अय्यर तंदुरुस्त होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण अय्यर अद्याप त्यातून सावरलेला दिसत नाही. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर याला आयपीएलच्या सोळाव्या हंगामालाही मुकावे लागले होते. बीसीसीआयची मेडिकल टीम श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे, अय्यरची दुखापतीतून संथ गतीने सावरत असल्यामुळे बीसीसीआयच्या अडचणी वाढल्या आहेत. 


बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला अय्यरच्या संथ रिकव्हरीव वक्तव्य केले. ते म्हणाले की,  श्रेयस अय्यर आगामी विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होईल, अशी आपेक्षा आहे. पण अय्यरच्या दुखापतीवर आताच बोलणं कठीण आहे. केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह वेगाने दुखापतीतून सावरत आहेत. 


सूर्यकुमार यादव अथवा संजू सॅमसनला मिळेल संधी ?


विश्वचषकाला अवघे तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी भारतीय संघाला तयारीसाठी आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेचा फायदा होणार आहे. श्रेयस अय्यर विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त झाला नाही तर सूर्यकुमार यादव अथवा संजू सॅमसन यांना संधी मिळू शकते. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संजू सॅमसन याला संघात स्थान देत निवड समितीने तसे पाऊल उचलले आहे. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन फिरकी गोलंदाजीचा चांगल्या पद्धतीने सामना करु शकतात. संजूच्या रुपाने भारतीय संघाला अतिरिक्त यष्टीरक्षकही मिळेल. भारतीय संघाचे विश्वचषकाचे अभियान 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 


भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक पाहा -


8 ऑक्टोबर 2023 – भारत vs ऑस्ट्रेलिया, चेन्नई


11 ऑक्टोबर 2023– भारत vs अफगाणिस्तान, दिल्ली









 


15 ऑक्टोबर 2023 – भारत vs पाकिस्तान, नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद


19 ऑक्टोबर 2023 – भारत vs बांगलादेश, पुणे


22 ऑक्टोबर 2023 – भारत vs न्यूझीलंड, धर्मशाला


29 ऑक्टोबर 2023 – भारत vs इंग्लंड , लखनौ


2 नोव्हेंबर 2023 – भारत vs Qualifier 2, मुंबई


5 नोव्हेंबर 2023 – भारत vs दक्षिण आफ्रिका, कोलकाता


11 नोव्हेंबर 2023 – भारत vs Qualifier 1, बेंगलोर


8 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना - 
भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेन्नईच्या मैदानात सामना रंगणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना असेल.