नवी दिल्ली : टीम इंडियाचा (Team India) क्रिकेटपटू शिवम दुबे (Shivam Dube) याची पत्नी अंजुम खान (Anjum Khan) हिनं सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम स्टोरी ठेवत भाजपच्या नझिया इलाही खान (Nazia Ilahi Khan) यांच्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. या प्रकरणी वाद वाढू लागताच अंजुम खान हिनं स्टोरी डीलिट केली आहे. अंजुम खान हिनं इन्स्टाग्राम स्टोरी ठेवत नझिया इलाही यांच्यावर आरोप केले होते. नझिया इलाही खान यांनी प्रेषित मौहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप अंजुम खाननं केलं होतं. 
 


अंजुम खानच्या पोस्टमध्ये काय होतं?


अंजुम खान यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भाजपच्या नेत्या नझिया इलाही खान यांच्या फोटोवर इंग्रजीत बॉयकॉट लिहिलं होतं. आता नझिया इलाही हिच्यावर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. मुस्लिमांच्या विरोधात बोलता बोलता  ती प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगत आहे, असं अंजुम खान म्हणाली. तुमचं इमान मेलेलं नसेल आणि ते जिवंत असेल तर रिपोस्ट करा, असं आवाहन अंजुम खाननं केलं होतं. 



वाद कशामुळं सुरु झाला?


नझिया इलाही यांनी काही दिवसांपूर्वी एका मिडिया चॅनेलवर उत्तर प्रदेशच्या हॉटेल मालकांच्या नावाची पाटी लावण्याबाबत चर्चा सुरु होती त्यावेळी वादग्रस्त शब्दांचा वापर केला होता. 



नझिया इलाही खान काय म्हणाल्या?


 नझिया इलाही खान यांनी शिवम दुबेची पत्नी अंजुम खान यांच्यावर पलटवार केला. तुम्ही एका हिंदू व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. इस्लाम, शरियानुसार तुम्ही आता इस्लामचा भाग राहिलेला नाही. भारतीय क्रिकेटर आणि चेन्नईचा खेळाडू शिवम दुबेची पत्नी माझ्या विरोधात हिंसा वाढवणारी एक भडकाऊ, खोटी आणि काल्पनिक गोष्ट पोस्ट करत आहे, असं नझिया इलाही खान म्हणाली. 


नझिया इलाही खान हिनं जय शाह यांना ट्विट करत या खेळाडूवर लक्ष ठेवा. काही काल्पनिक गोष्टी तेलंगाणातून राहुल गांधींच्या निर्देशांनंतर पसरवल्या जात असल्याचा दावा नझिया इलाहीनं केला. अंजुम खान महिला काँग्रेसची सदस्य असू शकेल, असं नझिया इलाही खान म्हणाल्या. नझिया इलाही यांनी काही महिन्यांपूर्वी देखील वादग्रस्त वक्तव्य केली होती.







अंजुम खान हिच्याकडून स्टोरी डिलिट


शिवम दुबेची पत्नी अंजुम खान हिनं वाद वाढू लागताच इन्स्टाग्राम स्टोरी डिलिट केली आहे. अंजुम खान हिची स्टोरीवर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. 


संंबंधित बातम्या :


दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी ड्रॉ, आयसीसीकडून WTC चं रँकिंग जाहीर, भारत कितव्या स्थानी?

Harbhajan Singh : रोहित शर्मा आणि विराट कोहली किती वर्ष खेळतील, कधी निवृत्त होतील, हरभजन सिंगनं वर्तवले वेगवेगळे अंदाज