Shivam Dube Stats & Records : टी20 विश्वचषकातील लो स्कोअरिंग सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जिवावर भारताने पाकिस्तानला लोळवलं. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या भारताचा डाव फक्त 119 धावांत संपुष्टात आला. टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात भारतीय संघ पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात ऑलआऊट झाला. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यासारखे धुरंधरही फेल ठरले. त्यात शिवम दुबे याचीही भर पडली. शिवम दुबे पुन्हा एकदा फेल गेला. दुबेला मोठी खेळी करता आली नाही. दुबे याला शानदार खेळी करण्याची संधी होती, पण तो सातत्यानं फेल होत असल्याचं आकड्यावरुन दिसतेय. आयपीएलमध्ये शानदार फटकेबाजी कऱणाऱ्या दुबेला मागील काही सामन्यात फेल गेल्याचं दिसतेय. पाकिस्तानविरोधातही दुबे फेल ठरला.
आघाडीचे फलंदाज फेल गेल्यानंतरही शिवम दुबे यानं निराश केले. शिवम दुबे मैदानावर स्थिरावण्याची गरज होती. पण निर्धाव चेंडूचा दबाव घेत चुकीचा फटका मारत दुबेनं विकेट फेकली. दुबेला 9 चेंडूमध्ये फक्त तीन धावा करता आल्या. दुबे फेल गेल्यानंतर चाहत्यांमध्ये संतापाचे वातावऱण आहे. सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जातेय. रिंकू सिंह याला डावलत दुबे याला विश्वचषकात संधी देण्यात आली. त्याला न्याय देता येत नसल्याचं चाहत्यांचे म्हणणे आहे. आयपीएलच्या सुरुवातीला शिवम दुबे लयीत होता, त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता. पण विश्वचषकात निवड झाल्यानंतर दुबेचा फॉर्म गायब झालाय.
मागील आठ डावात दुबेची लाजीरवाणी कामगिरी -
आकडे पाहिल्यास शिवम दुबे याला दोन महिन्यात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. मागील आठ डावामध्ये शिवम दुबे याला एकदाही 30 धावसंख्या पार करता आली नाही. शिवम दुबे याला मागील आठ डाव्यात एकदाही प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यातच पाकिस्तानविरोधात त्यानं सुरुवातीला झेलही सोडला होता. त्यामुळे दुबे याच्यावर टीका होतेय.
शिवम दुबे याने मागील आठ डावात अनुक्रमे 0, 0, 21, 18, 7, 14, 0 आणि 3 धावाच केल्या. शिवम दुबे याची सर्वेच्च धावसंख्या 21 इतकीच राहिली. शिवम दुबे याला मागील आठ डावात 63 धावाच करत आल्या. विश्वचषकात स्थान मिळण्याआधी शिवम दुबे शानदार फॉर्मात होता. त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. टी20 विश्वचषकात शिवम दुबे याला स्थान मिळाले, त्यानंतर त्याचा फॉर्म गायब झाला. दुबे याला संघात निवडल्यामुळे रिंकू सिंह याला 15 जणांच्या चमूत स्थान मिळाले नाही. त्यामुळे शिवम दुबे याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
भारताचा 6 धावांनी विजय -
बाबर आझम यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 119 धावाच केल्या. भारताकडून फक्त ऋषभ पंत यालाच प्रभावी कामगिरी करता आली. पंतचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शिवम दुबे हे सपशेल अपयशी ठरले. पण भारतीय गोलंदाजांनी 120 धावांचा बचाव यशस्वी केला. पाकिस्तानच्या फलंदाजांना डोकं वर काढून दिले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं चार षटकात 14 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.