India Tour Of Zimbabwe: भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर (Team India) आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्याशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ज्यावेळी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघाची घोषणा केलीय. त्यावेळी शिखर धवनकडं (Shikhar Dhawan) भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. परंतु, भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) दुखापतीतून सावरल्यानंतर त्याचं भारतीय संघात पुनरागमन झालं. याचबरोबर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. यावर शिखर धवननं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.

शिखर धवन काय म्हणाला?
"केएल राहुलचं भारतीय संघात पुनरागमन झालं आणि तो संघाचं नेतृत्व करेल ही चांगली गोष्ट आहे. केएल राहुल हा भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी करेल, अशी मला आशा आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर या मालिकेतून बाहेर पडल्याचं दु:ख आहे. पण दुखापत क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीचा एक भाग आहे. लवकरच वॉशिंग्टन सुंदर भारतीय संघात कमबॅक करेल. या दौऱ्यात युवा खेळाडूंना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील."

झिम्बाब्वे दौऱ्यात दाखवणार दम
पुढे शिखर धवन म्हणाला की, "झिम्बाब्वे दौऱ्यात मला जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. माझी मानसिकता नेहमीच सकारात्मक राहिली असून ही मालिका माझ्यासाठी मोठी संधी आहे." झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाबद्दलही शिखर धवननं भाष्य केलं. "सिकंदर राजा हा हुशार खेळाडू आहे. तो बराच काळ झिम्बाब्वेकडून खेळत आहे. सिकंदर रझा हा प्रतिभावान खेळाडू आहे." 

झिम्बाब्वे दौऱ्यातील भारतीय संघाचं वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब

झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय संघ भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर शाहबाज अहमद.


हे देखील वाचा-