Mohammed Shami : भारतात सुरु असलेला विश्वचषक उत्तरार्धाकडे झुकलाय. विश्वचषक रोमांचक स्थितीत पोहचलाय. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे.  भारताच्या गोलंदाजांनी विश्वचषकात भेदक मारा केलाय. बुमराह, सिराज आणि शामी यांच्यापुढे एकही फलंदाज टिकेला नाही.  भारताच्या कामगिरीवर पाकिस्तानमधील काही लोक खूश नसल्याचे दिसतेय. अख्ख्या जगात कौतुक होत असताना  पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा याने हद्द ओलांडली. त्याने भारतीय गोलंदाजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत पाकिस्तानची लाज काढली आहे. हसन रझा याच्यावर भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने संताप व्यक्त करत तिखट प्रतिक्रिया दिली.


हसन रझा काय म्हणाला होता ?


विश्वचषक स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी दबदबा निर्माण केलाय. बुमराह, सिराज आणि शामी या वेगवान माऱ्यासमोर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज नांगी टाकत आहेत. भारताच्या भेदक माऱ्याचा सामना करणं, प्रतिस्पर्धी संघाच्या अवाक्यात नसल्याचे दिसतेय. भारताने श्रीलंकेला 55 धावांत ऑलआऊट केले. त्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू हसन रझा याने वादग्रस्त वक्तव्य केले. स्थानिक वृत्तवाहिनीवर बोलातान हसन रझा म्हणाला की, मला असे वाटत आहे की, आयसीसी आणि बीसीसीआय भारतीय गोलंदाजांना वेगळ्या पद्धतीचा चेंडू देत आहेत. हा चेंडू अधिक स्विंग होतोय. याची चौकशी व्हायला हवी.


शामीने हसन रझाला झापले? 


मोहम्मद शामीने ट्विटर आणि इन्स्टाग्रावर हसन रझा याचा समाचार घेतला. त्याची लाजच काढली. शामी म्हणाला की,  थोडी लाज वाटू द्या रे. खेळावर लक्ष केंद्रित करा. बाकीच्या फालतू गोष्टींवर नाही.  दुसऱ्याच्या यशाचाही आनंद घ्या. हा विश्वचषक आहे, एखादी द्विपक्षीय मालिका नाही. तू एक खेळाडू राहिलाय. वसीम भाईने देखील तुम्हाला सांगितले आहे. दिग्गज वसीम भाईवर तरी विश्वास ठेवा. स्वतःचेच कौतुक करत आहात जस्ट लाईक वाव....


हसन रझा याच्या वक्तव्यावर माजी खेळाडू वसीम अक्रम यांनाही भडक प्रतिक्रिाय दिली होती. हे हास्यस्पद असल्याचे वसीम अक्रम म्हणाले होते. त्याशिवाय त्यांनी चेंडू कसा निवडला जातो, त्याची प्रोसेस काय असते.. याबाबत वृत्तवाहिनीवर सांगितले. 











मोहम्मद शामीची विश्वचषकातील कामगिरी - 


मोहम्मद शामीने याला यंदाच्या विश्वचषकात सुरुवातीच्या 4 सामन्यांना बेंचवरच बसवले होते. पण पुण्यात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर मोहम्मद शामीला टीम इंडियात स्थान मिळाले. मोहम्मद शामीने 4 सामन्यात 16 विकेट् घेऊन खळबळ माजवली. शामीने न्यूझीलंडविरोधात पाच, इंग्लंडविरोधात चार आणि श्रीलंकेविरोधात पाच विकेट्स घेतल्या. कोलकात्यात आफ्रिकेविरोधात शामीने महत्वाच्या दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शामी विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने झहीर खानचा विक्रम मोडीत काढलाय. मोहम्मद शामी आयसीसी क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. आजच आयसीसीने वनडे क्रमवारी जारी केली. यामध्ये मोहम्मद शामीने दहावे स्थान काबिज केलेय. शामीने यंदाच्या विश्वचषकात भेदक मारा केलाय, त्याने भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचललाय.