Riteish Deshmukh On Glenn Maxwell : वानखेडे मैदानावर ग्लेन मॅक्सवेलने अफगाण गोलंगदाजांची (AUS vs AFG) धुलाई करत ऑस्ट्रेलियाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. 91 धावांत सात विकेट् गेल्यानंतर मॅक्सवेलने (Glenn Maxwell ) द्विशतक ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दुखापत झाल्यानंतरही मॅक्सवेलने जिद्द सोडली नाही. त्याने झुंजार खेळी करत विजय खेचून आणला. मॅक्सवेलच्या अविश्वनीय खेळीचे सर्वजण चाहते झाले. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, किंग विराट कोहलीपासून ते वीरेंद्र सहवाग यांनीही मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell ) झुंजार खेळीचे कौतुक केले. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखही (Actor Riteish Deshmukh) मॅक्सवेलच्या खेळीचा जबरा फॅन झालाय. त्याने सोशल मीडियावर मॅक्सवेलबद्दल पोस्ट करत कौतुक केलेय. रितेश देशमुखच्या पोस्टला आमीर खान यानेही दाद दिली आहे. 


रितेश देशमुखची पोस्ट काय ?


रितेशने मॅक्सवेलची खेळी पाहून दोन ट्वीट केले. त्यातील पहिले ट्वीट हे मॅक्सवेलच्या शतकानंतर केले होते. त्याने पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “मॅक्सवेलने कमाल केली. काय खेळी केली. शानदार शतकाबद्दल अभिनंदन.”


मॅक्सवेलच्या द्विशतकानंतरही रितेश देशमुखने आणखी एक ट्वीट केले. तो म्हणाला की, “मॅक्सिमम सिटी – मॅक्सवेल जादू. यापेक्षा अविश्वसनीय खेळी मी कधीही पाहिली नाही. द्विशतक…हारलेली लढाई जिंकण्याची मॅक्सवेलची अतूट वचनबद्धता.”


रितेश देशमुखच्या दोन्ही पोस्ट 










रितेश देशमुखच्या पोस्टवर आमीर खान यानेही रिप्लाय दिला. Maximum - Well👍 असे रिट्विट आमीर खान याने केलेय. रितेश देशमुखचे मॅक्सवेलवर केलेले ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.  


मॅक्सवेलचे वादळी शतक - 


ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं त्याच्या आयुष्यातली सर्वोत्तम  खेळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारली. त्यानं प्रतिकूल परिस्थितीत आणि केवळ एका पायावर साऱ्या शरीराचा तोल पेलून १२८ चेंडूंत नाबाद २०१ धावांची खेळी केली. मॅक्सवेलच्या या खेळीला २१ चौकार आणि १० षटकारांचा साज होता. त्याच्या याच खेळीनं ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात एक रोमांचक विजय मिळवून दिला. या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २९२ धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची १९व्या षटकात सात बाद ९१ अशी दाणादाण उडाली होती. त्या परिस्थितीत ग्लेन मॅक्सवेलनं कर्णधार पॅट कमिन्सला हाताशी धरून ऑस्ट्रेलियाचा किल्ला लढवला. त्या दोघांनी आठव्या विकेटसाठी २०२ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यात कमिन्सचा वाटा ६८ चेंडूंत नाबाद १२ धावांचा होता.