Shardul Thakur Century News : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे, आणि आगामी कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर संघाने तयारीला सुरुवात केली आहे. इन्ट्रा-स्क्वॉड सराव सामन्यांद्वारे खेळाडूंची फॉर्म टेस्ट घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शार्दुल ठाकूरने नाबाद 122 धावांची तडाखेबाज खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या या खेळीमुळे कोच गौतम गंभीरला विचार करण्यास भाग पाडलं आहे. गंभीरला त्याला नक्कीच पहिल्या कसोटीत प्लेइंग-11 मध्ये स्थान देईल हे जवळपास निश्चित झाले आहे. शार्दुल फॉर्मात असणं म्हणजे टीम इंडियासाठी एक 'गोल्डन ट्रम्प कार्ड' असेल, पण इंग्लंडला नक्कीच घाम फुटला असेल.
इंग्लंडमध्ये 'लॉड' ठाकूरचं खणखणीत शतक
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी इन्ट्रा-स्क्वॉड सामना खेळत आहे. या सामन्यात शार्दुल ठाकूरने शानदार फलंदाजी केली आहे. शार्दुल 122 धावा करून नाबाद परतला. त्याच्या खेळीने सर्वांचे मन जिंकले आहे. शार्दुलपूर्वी, सरफराज खाननेही इन्ट्रा-स्क्वॉड सामन्यात शतक झळकावले. सरफराजने त्याच्या खेळीत 15 चौकार आणि 2 षटकारही मारले.
प्लेइंग-11 मध्ये ठाकूरची जागी पक्की?
इंग्लंड कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी शार्दुल ठाकूरने शतक झळकावले आहे, त्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. शतक झळकावून या खेळाडूने प्लेइंग-11 साठी दावेदारी ठोकली, यात शंका नाही. चांगली गोष्ट म्हणजे शार्दुल केवळ क्रमवारीत उतरून भारतासाठी मोठी खेळी खेळू शकत नाही, तर त्याच्याकडे वेगवान गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना त्रास देण्याची क्षमता देखील आहे. ज्यामुळे टीम इंडियाला विजय मिळू शकतो.
मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह मात्र फेल...
एकीकडे, भारतीय फलंदाज संघाच्या अंतर्गत संघात चांगली कामगिरी करत असताना, गोलंदाजांची कामगिरी काही खास राहिलेली नाही. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह फेल ठरले. दोन्ही गोलंदाज विकेटसाठी आसुसलेले दिसले. अशा परिस्थितीत, मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय गोलंदाजांनी फॉर्ममध्ये परतणे आता महत्त्वाचे आहे, अन्यथा भारताच्या समस्या वाढू शकतात.
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ -
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल.
हे ही वाचा -