Shane Warne Passes Away: फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचा वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शेन वॉर्नचे निधन हा ऑस्ट्रेलियाला एकाच दिवसात बसलेला दुसरा धक्का आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे निधन झाले, त्यानंतर आता शेन वॉर्न यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे शेन वॉर्नने एका ट्वीटच्या माध्यमातून 12 तासांपूर्वीच रॉड मार्श यांना श्रद्धांजली वाहिली होती. 


शेन वॉर्नने रॉड मार्शच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "रॉड मार्श यांच्या मृत्यूच्या वृत्ताने दु:ख झालं. ते क्रिकेटचे लिजेंड होत आणि अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत होते. त्यांनी क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली." 


 




रॉड मार्शना श्रद्धांजली वाहिल्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत शेन वॉर्नचा मृत्यू झाल्याने क्रिकेटविश्वाला धक्का बसला आहे. हा धक्का ऑस्ट्रेलियासाठी खूपच मोठा होता, कारण एकाच दिवसात दोन महान खेळाडूंना या देशाला मुकावं लागलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या;