Shai Hope Gets Hit Wicket : कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) 2025 मधील 17व्या सामन्यात एक विलक्षण घटना घडली. या सामन्यात गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्स आणि त्रिनबागो नाईट रायडर्स आमनेसामने आले. सामन्यादरम्यान त्रिनबागोचा विकेटकीपर-फलंदाज शाय होप अत्यंत विचित्र पद्धतीने आऊट झाला आणि त्याच्या या आउट होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली.

वाइड बॉल मारायला गेला अन् विचित्र पद्धतीने आउट झाला...

त्रिनबागो नाईट रायडर्सकडून टेरन्स हिंड्स गोलंदाजी करत होता. शाय होपने या चेंडूवर रिव्हर्स रॅम्प शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट खेळताना तो वाइड लाईनच्या बाहेर गेला आणि त्याच क्षणी त्याच्या बॅटवरचा ताबा सुटला. बॅट थेट स्टंप्सवर आपटला आणि त्याला बाद व्हावं लागलं. गंमत म्हणजे हा चेंडू वाइड होता, पण बॅट स्टंपला लागल्यामुळे त्याला बाद दिलं गेलं. अशी घटना क्रिकेटच्या इतिहासात फारच क्वचित घडलेली आहे.

शाय होपच्या संघाला पराभवाचा सामना

या सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्सने 6 विकेट्सने सहज विजय मिळवला. संघाकडून अ‍ॅलेक्स हेल्सने केवळ 43 चेंडूत 74 धावा केल्या. त्यात 3 चौकार आणि तब्बल 7 षटकारांचा समावेश होता. हेल्सचा स्ट्राईक रेट तब्बल 172 होता. त्याला कॉलिन मुन्रोनेही चांगली साथ दिली आणि 30 चेंडूत झळकावलेले 52 धावांचे झंझावाती योगदान दिले. या दोघांच्या तुफानी खेळीमुळे त्रिनबागोने 164 धावांचे लक्ष्य फक्त 17.2 षटकांत गाठले.

गयानाची फलंदाजी झाली फेल

गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 163 धावा केल्या. संघाकडून शाय होपने सर्वाधिक 29 चेंडूत 39 धावा केल्या. त्याशिवाय ड्वेन प्रिटोरियसने 21 आणि क्विंटन सॅम्पसनने 25 धावा केल्या. त्रिनबागोच्या अकील हुसेनने उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 बळी घेतले आणि त्यालाच सामनावीर पुरस्कार मिळाला.

हे ही वाचा -

Asia Cup 2025 Match Timing Revised : भारत-पाकिस्तानसह 18 सामन्यांच्या टाइमिंग मध्ये मोठ्या बदल, आता किती वाजता रंगणार थरार? जाणून घ्या A टू Z

Team India New ODI Captain : गिल अन् श्रेयस अय्यरचा पत्ता कट, 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा पुढचा कर्णधार? धोनीच्या जिगरी मित्राची मोठी भाकीत