India vs South Africa Final Women World Cup 2025 : महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) जबरदस्त खेळी साकारली. तिने 87 धावांची आकर्षक खेळी करून संघाला दमदार सुरुवात करून दिली. शेफालीच्या या खेळीमुळे भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड घेतली. आज सर्वत्र तिच्या पुनरागमनाची चर्चा सुरू आहे, कारण असा ‘कमबॅक’ प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी आहे.

Continues below advertisement

Continues below advertisement

टीममधून बाहेर झाल्यानंतरही शेफाली थांबली नाही...

महिला विश्वचषक 2025 साठी निवड झालेल्या 15 जणींच्या भारतीय संघात शेफालीचे नाव नव्हते. त्या वेळी तिची फॉर्म आणि फिटनेसवर बरीच चर्चा होती. मात्र, शेफालीने निराश होण्याऐवजी देशांतर्गत क्रिकेटकडे वळून तिथे जबरदस्त कामगिरी केली. सतत रन काढत राहिली आणि आपले स्थान पुन्हा मिळवण्याची तयारी ठेवली.

प्रतिका रावलच्या दुखापतीनंतर मिळाली संधी

बांगलादेशविरुद्धच्या लीग स्टेजमधील अखेरच्या सामन्यात भारतीय ओपनर प्रतिका रावल फील्डिंगदरम्यान जखमी झाली. त्यामुळे ती संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली. या संधीचा फायदा घेत शेफालीला पुन्हा टीममध्ये बोलावण्यात आले आणि तिने हे संधीचं सोनं केलं.

फायनलमधील धमाकेदार खेळी 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये शेफाली वर्माने स्मृती मंधानासोबत शतकी भागीदारी केली. या जोडीने भारतासाठी 102 धावांची भक्कम सलामी भागीदारी रचली. शेफालीने 78 चेंडूंमध्ये 87 धावा करत 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. तिच्या या इनिंगने भारताला विजयाची भक्कम पायरी मिळवून दिली.

एकेकाळी असे वाटत होते की भारतीय संघ 250 धावांपर्यंत पोहोचेल, परंतु मधल्या फळीतील घसरगुंडी आणि संथ फलंदाजीमुळे ते शक्य झाले नाही आणि भारतीय संघ फक्त 298 धावांपर्यंत पोहोचू शकला. महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे आणि विश्वचषक अंतिम सामन्यातील भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे.

फलंदाजीनंतर शेफाली वर्माही गोलंदाजीत चमकली

फलंदाजीनंतर शेफाली वर्माही गोलंदाजीत चमकली. तिने तिच्या दोन षटकांत दोन मोठ्या विकेट्स घेतल्या. शेफाली वर्माने आधी सून लुस आणि नंतर अनुभवी मॅरिझाने कॅपला बाद केले. कॅप फक्त चार धावा करू शकली. त्याआधी शेफालीने लुस आणि वोल्वार्ड यांच्यातील अर्धशतकी भागीदारी मोडली होती. शेफालीने स्वतःच्या गोलंदाजीवर लुसचा झेल घेतला. ती फक्त 25 धावा करू शकली. लुस आणि वोल्वार्ड यांनी 52 धावांची भागीदारी केली.

हे ही वाचा - 

Kuldeep Yadav अर्ध्यातच टी-20 मालिका सोडून कुलदीप  यादव परतला भारतात; ऑस्ट्रेलिया नेमकं काय घडलं? BCCI ने ट्वीट करत कारण सांगितलं