India vs Pakistan Hong Kong Sixes 2025 : टूर्नामेंट कोणतीही असो, पण जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतात, तेव्हा साऱ्या जगाचं लक्ष या सामन्याकडेच लागलेलं असतं. हाँगकाँग सिक्सेस 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना खेळवला गेला. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला. पाकिस्तान हा सामना जिंकण्याच्या बेतात असतानाच अचानक पावसाने खेळात खंड पाडला आणि डकवर्थ-लुईस नियमामुळे भारताने 2 धावांनी विजय मिळवला. 

Continues below advertisement

पाऊस सुरू आला अन् सामना फिरला! 

87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात जबरदस्त झाली होती. त्यांनी अवघ्या 3 षटकांत 1 गडी गमावून 41 धावा केल्या होत्या. पण त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवावा लागला. नंतर पाऊस न थांबल्याने खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही. यानंतर डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तान भारतापेक्षा 2 धावांनी मागे होता आणि त्यामुळे विजय भारताच्या झोळीत पडला.

Continues below advertisement

रॉबिन उथप्पाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना धू धू धुतले....

या रोमांचक लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फलंदाजीस सुरुवात केली. या सामन्यात भारताने 6 षटकांत 4 गडी गमावून 86 धावा केल्या. या दरम्यान रॉबिन उथप्पा 11 चेंडूत 28 धावा करून माघारी परतला, तर भरत चिपलीने 13 चेंडूत 24 धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नी (2 चेंडूत 4) आणि अभिमन्यू मिथुन (5 चेंडूत 6) लवकर बाद झाले. शेवटी कर्णधार दिनेश कार्तिक 6 चेंडूत 17 धावा करून नाबाद राहिला. परिणामी भारताने पाकिस्तानसमोर 87 धावांचे लक्ष्य ठेवले.

पाकिस्तानकडून सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला मोहम्मद शहजाद, ज्याने आपल्या एका षटकात फक्त 15 धावा देत 2 महत्त्वाची बळी टिपले. अब्दुल समदने 16 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली. शाहिद अजीजने एका षटकात 13 धावा दिल्या, तर डावखुरा फिरकीपटू माज सदाकतने 2 षटकांत केवळ 19 धावा खर्च करत अचूक गोलंदाजी केली.

हाँगकाँग सिक्सेसचे वेगळे नियम

हाँगकाँग सिक्सेस हा पारंपरिक क्रिकेटपेक्षा पूर्णपणे वेगळा फॉरमॅट आहे. या स्पर्धेत प्रत्येक डाव फक्त 6 षटकांचा असतो. मात्र उपांत्य आणि अंतिम फेरीत प्रत्येक षटक 8 चेंडूंचं असतं. या फॉरमॅटमध्ये नो-बॉलवर फ्री-हिट मिळत नाही, तसेच एखादा फलंदाज अर्धशतक ठोकला की तो रिटायर्ड हर्ट घोषित होतो. सगळ्यात खास म्हणजे येथे प्लेइंग-11 नव्हे तर प्लेइंग-6 असते. म्हणजे प्रत्येक संघात फक्त 6 खेळाडू मैदानात उतरतात.

हे ही वाचा -

Pratika Rawal Medal : PM मोदींच्या भेटीवेळी ते बघताच जय शाह भावूक, एक मोठा निर्णय अन् प्रतिका रावलच्या डोळ्यात पाणी, नेमकं काय घडलं?