Anushka Sharma On Viat kohli: आशिया कप 2022 च्या सुपर 4 सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं अफगाणिस्तानविरुद्ध (IND Vs AFG)  122 धावांची तुफानी खेळी केली. दरम्यान, जवळपास तीन वर्षानंतर विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. विराटनं त्याची ही दमदार खेळी पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला समर्पित केली. तसेच कठिण काळातून जात असताना अनुष्कानं नेहमीच त्याला पाठिंबा दिल्याचं विराटनं म्हटलंय. त्यानंतर अनुष्कानंही विराटसाठी इन्स्टाग्रामवर विराटसाठी खास पोस्ट केलीय. 


अनुष्कानं विराटचे भारतीय संघाच्या जर्सीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनुष्कानं लिहलंय की, 'मी कोणत्याही आणि कायमस्वरूपी तुझ्या सोबत असेल'. अनुष्काच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. वरुण धवन, श्रद्धा कपूर, रणवीर सिंह, अथिया शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांनी अनुष्काच्या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.


अनुष्का शर्माची इन्स्टाग्राम पोस्ट-




 


अनुष्का आणि वामिकाला शतक समर्पित
विराट कोहलीने अफगाणिस्तानविरूद्धच्या टी-20 सामन्यात धडाकेबाज शतकी खेळी केली. मात्र, ही शतकी खेळी विराटचे चाहते, संघ किंवा प्रशिक्षकांना समर्पित नाही तर ही शतकी खेळी फक्त आणि फक्त विराटची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका यांना समर्पित आहे. कराण या दोघींनीच विराट कोहलीला त्याच्या कठिण काळात साथ दिली. विराट म्हणाला की, "यावेळी फक्त एकच विशेष व्यक्ती आहे, जी कठिण काळात माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहिली. तिनं सर्व काही पाहिले ती म्हणजे अनुष्का."


अनुष्का शर्माची पुढचा चित्रपट
अनुष्का शर्माचा पुढचा चित्रपट चकदा एक्स्प्रेसमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट भारताची महिला स्टार क्रिकेटपटू झुलन गोस्वामींवर आधारीत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अनुष्का तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाचा एका क्रिकेटपटूंची भूमिका साकरणार आहे. यासह दिर्घकाळानंतर ती चित्रपटात दिसणार आहे. याआधी ती 2018 मध्ये झिरो चित्रपटात झळकली होती. ज्यात शाहरूख खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसले होते. 


हे देखील वाचा-