Sai Sudharsan Debut Eng vs Ind 1st Test News : इंग्लंडविरुद्ध शुक्रवार (20 जून) पासून लीड्स येथे सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात साई सुदर्शनला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. तो भारताकडून कसोटी खेळणारा 317 वा खेळाडू आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. साईंपूर्वी, दिग्गज राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा सारखे फलंदाज या स्थानावर खेळले आहेत.
साई सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेटपासून आयपीएलपर्यंत चमकदार कामगिरी केली, त्यानंतर त्याला कसोटी कॅप देण्याचा निर्णय घेण्यात आला. साई सुदर्शन तामिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.
साई सुदर्शनची कारकीर्द -
साई सुदर्शनने 17 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारताकडून पदार्पण केले, जिथे त्याने 43 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. त्याने टीम इंडियासाठी 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच, त्याने 2023 च्या आशियाई खेळांमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले.
2023 मध्ये, साई सुदर्शनने काउंटी क्रिकेट क्लबकडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या पहिल्या हंगामात शतक झळकावले आणि सरेला चॅम्पियनशिप जिंकण्यास मदत केली. साई सुदर्शन तामिळनाडूकडून टी-20, लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. 2022-23 मध्ये त्याने रणजी ट्रॉफी हंगामात पदार्पण केले ज्यामध्ये त्याने दोन शतके झळकावली. साई सुदर्शनने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत.
त्याच वेळी, 2025 च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करून सुदर्शन ऑरेंज कॅप विजेता ठरला. त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 759 धावा केल्या. त्याच्या जबरदस्त फॉर्ममुळे त्याला कसोटी संघात संधी देण्यात आली.
अभिमन्यू ईश्वरनला का वगळण्यात आले?
आता प्रश्न असा निर्माण होतो की, 27 शतके झळकावणारा अनुभवी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अभिमन्यू ईश्वरनला का वगळण्यात आले? यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. साई सुदर्शनचा अलीकडील फॉर्म आणि त्याचे तंत्र. सुदर्शन चेंडू उशिरा खेळण्यासाठी ओळखला जातो, जो इंग्लंडच्या वेगवान आणि स्विंग खेळपट्ट्यांवर फलंदाजीसाठी फायदेशीर आहे. आता साई सुदर्शन लीड्सच्या मैदानावर त्याच्या पदार्पणाचे यशात किती रूपांतर करू शकतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.
हे ही वाचा -