Sahil Parakh India U19 squad against Australia U19 : नाशिकच्या शिरपेचात आणखी एक तुरा क्रिकेटर साहिल पारखने रोवला आहे. अंडर-19 भारतीय टीम मध्ये नाशिकच्या साहिल पारखची निवड झाली आहे. साहिल हा नाशिकच्या क्रिकेट इतिहासातील भारतीय संघात निवड झालेला पहिला क्रिकेटर ठरला आहे. 21 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जाणार आहे.
त्यामुळे आज नाशिकमध्ये साहिल पारखचे जंगी स्वागत करण्यात आले. साहिलच्या आई-वडिलांचे स्वप्न आणि नाशिकच्या क्रिकेट असोसिएशनने मागच्या अनेक वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीचा फळ साहिलने नाशिककरांना दिले आहे.
यासोबत भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय अंडर-19 संघात निवड झाली आहे. समितला एकदिवसीय आणि चार दिवसीय मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. तर एकदिवसीय संघाचे नेतृत्व मोहम्मद अमानकडे असेल, तर चार दिवसीय सामन्यांचे कर्णधारपद सोहम पटवर्धनकडे सोपवण्यात आले आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक कसे असेल?
ऑस्ट्रेलिया-19 विरुद्धच्या तीन एकदिवसीय आणि दोन चार दिवसीय कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 21, 23 आणि 26 सप्टेंबर रोजी तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. यानंतर पहिला कसोटी सामना 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर आणि दुसरा कसोटी सामना 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान होईल. तीन एकदिवसीय सामने पाँडेचेरीमध्ये आणि दोन कसोटी सामने चेन्नईमध्ये खेळवले जातील.
भारताचा एकदिवसीय अंडर-19 संघ : रुद्र पटेल, साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक), समित द्रविड, युद्ध गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राज अवत, मोहम्मद अनन.
भारताचा अंडर-19 कसोटी संघ : वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंशसिंग पानगालिया (विकेटकीपर), चेतन शर्मा , समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद अनन.