Sachin Tendulkar ODI World Cup Records : सचिन रमेश तेंडुलकर.... म्हणजेच क्रिकेटचा देव....... एकदिवसीय विश्वचषक म्हटले की सचिनचं नाव येतेतच.. भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपला आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे. क्रिकेट चाहते आधीच्या विश्वचषकाबद्दल आणि विक्रमाबद्दल जाणून घेत आहेत. सचिन तेंडुलकरचा असाच एक विक्रम मोडणं कठीण आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे.  वनडे विश्वचषकातील सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. हा विक्रम मोडणं कठीम आहे. सचिन तेंडुलकरने एकूण सहा विश्वचषकात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे.  1992 ते 2011 या 24 वर्षांत सहा विश्वचषक खेळणाऱ्या सचिनच्या नावावर धावंचा डोंगर आहे. आता खेळणारा कोणताही खेळाडू त्याच्या आजूबाजूलाही नाही. 


सचिन तेंडुलकर याने 1992 ते 2011 या कालावधीत विश्वचषकाच्या 45 सामन्यातील 44 डावात 56.96 च्या जबराट सरासरीने 2278 धावांचा पाऊस पाडला आहे.  यामध्ये सहा शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. आता विश्वचषख खेळत असलेल्या खेळाडूमध्ये विराट कोहली आहे, पण विराट कोहलीला 26 सामन्यात 1030 धावा करता आल्या आहेत. त्याशिवाय न्यूझीलंडचा टेलर याने 30 डावात 1002 धावा केल्या आहेत. वॉर्नरने 21 सामन्यात 992 आणि रोहित शर्मा 978 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पाँटिंगच्या नावावर 1743 धावांची नोंद आहे. 


वनडे  विश्वचषकात 2278 धावांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणं सध्या तरी शक्य दिसत नाही. 2278 धावांसाठी सचिन तेंडुलकर याने 24 वर्ष खर्च केली आहेत. सचिनच्या या विक्रमाच्या आसपासही कुणी दिसत नाही. 




 सचिन तेंडुलकरने कोणत्या वर्ल्ड कपमध्ये किती धावा केल्या ?


1991-92 वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकर याने सात डावात 283 धावा केल्या होत्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता. 


1996 वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरने सात डावात 523 धावा केल्या होत्या. यामध्ये दोन शतकांचा समावेश होता. सेमीफायनलमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले होते, जोपर्यंत सचिन मैदानावर होता, तोपर्यंत भारताच विजय होईल, असे सर्वांना वाटत होते. 
  
1999 वर्ल्ड कपने सचिन तेंडुलकरला नवी ओळख दिली. या स्पर्धेदरम्यान सचिन तेंडुलकरच्या वडिलांचे निधन झाले होते. पण सचिन तेंडुलकर अंतिम विधी झाल्यानंतर सामन्यात परतला... दुसऱ्याच दिवशी त्याने शतकी खेळी केली होती. या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने सात डावात 253 धावांचा पाऊस पाडला होता. 
 
2003 वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरने धावांचा पाऊस पाडला होता. सचिन तेंडुलकरने 11 डावात 673 धावांचा पाऊस पाडला होता. पाकिस्तानविरोधात 98 धावांची खेळी आजही सर्वांच्या लक्षात आहे. 


2007 वर्ल्ड कप भारतासाठी आणि सचिन तेंडुलकरसाठी अतिशय खराब राहिला. भारताचे साखळी फेरीतच आव्हान संपले. सचिन तेंडुलकरने तीन सामन्यात 64 धावा केल्या.


2011 वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकर याने दमदार फलंदाजी केली. सचिनने 9 डावात 482 धावांचा पाऊस पडला. 24 वर्षांच्या दीर्घ करिअरचा शेवट गोड झाला.  


एक विश्वचषकात सर्वाधिक धावा - 


एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या वर्ल्डकपमध्ये 673 धावांचा पाऊस पाडला होता. हा विक्रम आजही अबाधित आहे. 2019 मध्ये रोहित शर्मा या विक्रमाच्या जवळ पोहचला, पण मोडता आला नाही. यंदाच्या विश्वचषकात सचिनचा हा विक्रम अबाधित राहणार की मोडणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.