SA20 Final 2025 MI Cape Town vs Sunrisers Eastern Cape: मुंबई इंडियन्सने आणखी एक ट्रॉफी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दक्षिण अफ्रिका टी-20 2025 च्या अंतिम सामन्यात MI केप टाऊन संघानं बाजी मारली. MI केप टाऊनने सनरायझर्स ईस्टर्न केपचा पराभव करून विजेतेपद जिंकले. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने आयपीएल, यूएस T20 आणि दुबई T20 लीगनंतर जिंकली चौथी T20 लीग जिंकली आहे.
SA20 च्या अंतिम सामन्यात, MI केपटाऊनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 8 विकेट्स गमावत 181 धावा केल्या. कॉनर एस्टरहुइझेनने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. कॉनर एस्टरहुइझेनने 26 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या.
MI केपटाऊनने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सनरायझर्स ईस्टर्न केप मैदानात उतरले आणि 18.4 षटकांत 105 धावांवर सर्व खेळाडू बाद झाले. सनरायझर्सची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डेव्हिड बेडिंगहॅम (05) च्या रूपात संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जॉर्डन हरमन (01) च्या रूपात संघाने आपला दुसरा बळी गमावला. यानंतर संघाने झटपट विकेट्स गमावल्या. त्यामुळे 18.4 षटकांत सनरायझर्स ईस्टर्न केप संघाला केवळ 105 धावा करता आल्या आणि MI केप टाऊन अंतिम सामना 76 धावांनी जिंकला.