Rajasthan Royals Trade Deal For Sanju Samson: राजस्थान रॉयल्सचाकॅप्टनसंजूसॅमसनआयपीएलच्या2026 पूर्वी टीम सोडण्याच्या तयारीत आहे.मिडिया रिपोर्टसनुसारसॅमसननं राजस्थान रॉयल्सलारिलीज करण्याची विनंती केली आहे. राजस्थान रॉयल्सनं देखील याचा फायदा करुनघ्यायचं ठरवलं आहे. राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपरकिंग्ज सोबत ट्रेड डील करण्याची तयारी दर्शवली आहे. रिपोर्टनुसार राजस्थानच्या टीमनंसॅसमनच्या बदल्यात चेन्नईच्या तीन खेळाडूंची यादी तयार केली असून त्यापैकी एकाला संघात घ्यायचं आहे.
चेन्नई सुपरकिंग्जच्या3 खेळाडूंवर राजस्थानची नजर
राजस्थान रॉयल्सलासंजूसॅमसनला संघातून बाहेर जायला सांगत नाही. मात्र, सॅमसनलास्वत:टीमच्या बाहेर जायचं आहे. मात्र, राजस्थान रॉयल्ससॅमसनच्या बदल्यात आक्रमक खेळाडूला संघात सामील करुन घेण्याचा प्रयत्न करतेय. राजस्थाननं चेन्नईच्या रवींद्रजडेजा, ऋतुराज गायकवाड आणि शिवमदुबे या तिघांची नावं दिली आहेत. राजस्थान रॉयल्स तीन पैकी एक खेळाडू मिळाल्यास संजूसॅमसनच्या बदल्यात चेन्नईसोबत ट्रेड डील करण्याच्या तयारीत आहे.
आयपीएलमधील ट्रेड डील म्हणजे काय?
आयपीएलच्या2025 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सनंसंजूसॅसमनला18 कोटी रिटेन केलं होतं. चेन्नई सुपरकिंग्जनंरवींद्रजडेजा आणि ऋतुराजगायकवाडला18-18 कोटी रुपयांनारिटेन केलं होतं. तर, चेन्नईनंशिवमदुबेला12 कोटी रुपयेला घेतलं होतं. आयपीएल2026 साठी राजस्थान आणि चेन्नई यांच्यात ट्रेड डील झाल्यास संजूसॅमसनच्या बदल्यात रवींद्रजडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांच्यातील खेळाडू राजस्थानकडे गेल्यास आर्थिक देवाणघेवाण होणार नाही.
चेन्नई सुपरकिंग्जशिवमदुबेला राजस्थानसाठी सोडण्यास तयार झाल्यास सीएसकेला राजस्थान रॉयल्सला6 कोटी रुपये द्यावे लागतील. सॅमसनचीरिटेनप्राईसशिवमदुबेच्या तुलनेत 6 कोटी रुपये अधिक आहे. यालाच आयपीएलमधील ट्रेड डीलम्हटलं जातं. आयपीएलफायनल झाल्यानंतर आणि पुढील हंगाम सुरु होण्यापूर्वी 30 दिवस अगोदर ट्रेड डील करावी लागते.
