IND vs ENG 1st Test : पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील हैदराबाद कसोटीमध्ये भारताला (IND vs ENG) पराभवाचा सामना करावा लागला.  इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 28 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) झालेल्या सामन्यात पहिल्या तीन दिवसांपर्यंत भारतीय संघाचे वर्चस्व होतं. पण ओली पोपच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने पलटवार केला. पहिल्या डावात 190 धावांच्या आघाडीनंतर मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झाला. हैदराबाद कसोटी सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कुठे चूक झाली. त्याबाबत सांगितलं. 230 धावांच्या आव्हान कठीण नव्हते, पण संघाकडून चूक झाली, अशी प्रतिक्रिया रोहित शर्मा याने दिली आहे.  


ओली पोपचं कौतुक - 


सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, चार दिवसांच्या कसोटी सामन्यात नेमकी कुठे चूक झाली, हे शोधणं कठीण आहे. 190 धावांच्या आघाडीनंतर आम्ही विजयाच्या खूप जवळ होतं. पण इंग्लंडकडून ओली पोप याने शानदार खेळी केली. भारतीय खेळपट्टीवर विदेशी फलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम खेळी असेल. 


फलंदाजी कमजोर राहिली - 


चौथ्या डावात 230 धावा केल्या जाऊ शकत होत्या. खेळपट्टीवर फारसे काही नव्हते. पण आम्ही धावा करु शकलो नाही. गोलंदाजीचं विश्लेषण केले, आपण योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली होती. आमची फलंदाजी कमकुवत राहिली. सामन्यानंतर आपण काय चांगलं झालं काय वाईट झालं याचा विचार करतो. गोलंदाजी ठरल्याप्रमाणे झाली, पण ओली पोप याने शानदार फलंदाजी केली. त्याची खेळी जबरदस्त होती, असे रोहित शर्मा म्हणाला. 



अपयशी ठरलो - 


एक अथवा दोन गोष्टींवर खापर फोडनं कठीण आहे, आम्ही संघ म्हणून अपयशी ठरलो. पहिल्या डावातील सामन्यानंतर आम्हाला विजयाची आशा होती. पहिल्या डावात आम्ही आणखी धावा करायला हव्या होत्या. त्याशिवाय सिराज आणि बुमराहने सामना पाचव्या दिवशी न्यायला हवा होती. 20-30 रन, सामन्यात काहीही झालं असते, असे रोहित शर्मा म्हणाला. 


तळाच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. आघाडीच्या फलंदाजांना त्यांना दाखवून दिले की संघर्ष केला तर धावा निघू शकतात, असे रोहित शर्मा म्हणाला. 


आणखी वाचा :


IND vs ENG : गिल-अय्यरचा फ्लॉप शो, अक्षरची खराब फिल्डिंग, टीम इंडियाच्या पराभवाचे पाच 'विलन' 


U19 World Cup मध्ये युवा ब्रिगेड सुसाट, सलग तिसऱ्या विजयाची नोंद,  USA चा 201 धावांनी पराभव