Rohit on IND vs SL, 1st ODI : टीम इंडियाने गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा (IND vs SL) 67 धावांनी पराभव केला. ज्यामुळे भारतीय संघाने 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने शानदार शतकी खेळी खेळली.तर रोहितनेही कमाल अशी 83 धावांची खेळी केली. पण या दमदार विजयानंतरही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा संघाच्या कामगिरीवर आनंदी नसल्याचे त्याने सांगितले.


विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?


सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही फलंदाजीत चांगली सुरुवात केली. सलामीवीर म्हणून बाकीच्या फलंदाजांसाठी चांगली सुरुलवात आम्ही केली. मात्र आमचे गोलंदाज यापेक्षा चांगली गोलंदाजी करू शकले असते. पण तसंच पुढे बोलताना शर्मा म्हणाला की, या परिस्थितीत गोलंदाजी करणे सोपे नव्हते. मैदानात दव असल्यामुळे गोलंदाजांसाठी परिस्थिती अनुकूल नव्हती, पण तरीही आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, असंही तो म्हणाला


'शनाकाने शानदार फलंदाजी केली'


याशिवाय संघाच्या क्षेत्ररक्षणावर रोहित शर्माने आपली बाजू मांडली. तो म्हणाला की, हा सांघिक खेळ आहे, संघातील सर्व अकरा खेळाडूंना योगदान द्यावे लागते. तसेच श्रीलंकन कर्णधार दासून शनाकाच्या रनआऊटवर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, मोहम्मद शमीने काय केले हे मला माहीत नाही, त्यावेळी दशून शनाका 98 धावा करून खेळत होता. तसेच, टीम इंडियाचा कर्णधार म्हणाला की, दशून शनाका ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, आम्ही त्याला अशा प्रकारे बाद करू शकत नाही. रोहित शर्माने दशून शनाकाचे जोरदार कौतुक केले. 


67 धावांनी भारत विजयी


सामन्यात सर्वात आधी नाणफेक जिंकत श्रीलंका संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुिळे भारतीय संघ आधी फलंदाजीला आला. आधी फलंदाजी करत भारताने 374 धावांचे लक्ष्य श्रीलंका संघासमोर ठेवले. पण 50 षटकांत श्रीलंकेचा संघ 8 गडी गमावून 306 धावाच करु शकला ज्यामुळे भारत 67 धावांनी विजयी झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी श्रीलंकन कर्णधार दासून शनाकाने नाबाद 108 धावा ठोकत एक कडवी झुंज दिली, पण संघाला विजयी करण्यासाठी ही पुरशी नसल्याने अखेर श्रीलंका संघ पराभूत झाला.


हे देखील वाचा-