कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरी वनडे कोलंबोत सुरु आहे.  दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये देखील रोहित शर्माचा (Rohit Sharma) अनोखा अंदाज पाहायला मिळाला. रोहित शर्मानं पहिल्या मॅच प्रमाणं दुसऱ्या मॅचमध्ये देखील वॉशिंग्टन सुंदरची फिरकी घेतली. यावेळी विकेटकीपर केएल राहुल रोहितचा अनोखा अंदाज फक्त पाहत राहिला. वॉशिंग्टन सुंदरनं देखील रोहित शर्मा दिलेल्या सूचनेचा गांभिर्यानं विचार करुन व्यवस्थित गोलंदाजी केली. वॉशिंग्टन सुंदरनं (Washington Sundar) आजच्या मॅचमध्ये तीन विकेट घेतल्या. 


नेमकं काय घडलं?


रोहित शर्मानं वॉशिंग्टन सुंदरला 33 वी ओव्हर दिली होती. वॉशिंग्टन सुंदर या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी रन अप घेतल्यानं थांबत होता.  पहिल्या वेळी रोहित शर्मानं हे पाहून घेतलं. यानंतर दुसऱ्या वेळी देखील तसंच झालं. यावेळी रोहित शर्मा स्वत:ला रोखू शकला नाही. त्यानं वॉशिंग्टन सुंदरची गंमत करण्याचा प्रयत्न केला. तो मजेशीर अंदाजात सुंदरच्या दिशेनं धावत गेला. थोडं पुढं गेल्यानंतर रोहित शर्मा थांबला आणि सुंदरला इशारा केला. यावेळी विकेटकीपर केएल राहुल फक्त काय घडतंय ते पाहत होता. 


वॉशिंग्टन सुंदरनं पहिल्या बॉलवर जेनिथ लियानज याला आऊट केलं होतं. मात्र, श्रीलंकेनं डीआरएस घेतला आणि निर्णय त्यांच्या बाजूनं  गेला. यानंतर पुढचा बॉल टाकण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला दोन वेळा रन अप घ्यायला लागला. यावेळी रोहित शर्मा धावत थोडं पुढं आला आणि सुंदरला मारण्याचा इशारा दिला. केएल राहुलला हे पाहून हसू आवरता आलं नाही. 



दरम्यान, वॉशिंग्टन सुंदर भारताचा दुसऱ्या वनडेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं  17 व्या ओव्हरमध्ये अखेरच्या बॉलवर अविष्का फर्नांडोला बाद केलं. त्यानंतर पुढच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सुंदरनं कुसल मेंडिसला बाद केलं. यानंतर श्रीलंकेच्या कॅप्टनला देखील सुंदरनं बाद केलं. वॉशिंग्टन सुंदरनं चारिथ असलंकाला बाद केलं. 


रोहित शर्माचं अर्धशतक


श्रीलंकेन 50 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 240  धावा केल्या अन् भारतासमोर विजयासाठी 241 धावांचं आव्हान ठेवलं. रोहित शर्मानं पहिल्या मॅच प्रमाणं दुसऱ्या मॅचमध्ये देखील अर्धशतक झळकावलं. रोहित शर्मानं शुभमन गिलच्या साथीनं संघाला 97  धावांची सलामीची भागिदारी करुन दिली. रोहित शर्मा 64 धावांवर बाद झाल्यानंतर भारताला श्रीलंकेनं आणखी तीन धक्के दिले. शुभमन गिल, शिवम दुबे आणि विराट कोहली हे लवकर बाद झाले. 


रोहितचा सुंदरला इशारा 






संबंधित बातम्या :



IND vs SL : भारताच्या फिरकी गोलंदाजांची कमाल, दुनिथ वेल्लालगे-कमिंडू मेंडिसनं किल्ला लढवला, श्रीलंकेनं किती धावा केल्या?