नागपूर : भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील (Ind vs Eng) पहिल्या लढतीपूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानं आपल्याला माहिती आहे, क्रिकेटमध्ये चढ उतार येत असतात,मी अनेक करिअरमध्ये पाहिलेत, माझ्यासाठी हे नवं नाही. आपल्याला माहिती आहे प्रत्येक दिवस नवा असतो, प्रत्येक मालिका नवी असते. भूतकाळात काय घडलं यापेक्षा नव्या आव्हानांकडे लक्ष देतो, पुढं काय आहे याकडे पाहतो. मालिकेची सुरुवात चांगली करायचं नियोजन आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.
आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळावं लागतं. आम्हाला जे वर्ल्ड कपमध्ये करायचं होतं ते केलं.वर्ल्ड कपला सहा महिने होऊन गेले. आम्हाला पुन्हा एकत्र यायचंय आणि आम्हाला काय करायचंय याचा विचार करायचा आहे, असं रोहित शर्मानं म्हटलं.
अनेक अनुभवी खेळाडू टीममध्ये आहेत. त्यांनी प्रत्येक मालिकेसाठी काय करायचं हे सांगायची गरज नाही. बऱ्याच काळानंतर आम्ही या प्रकारात खेळत आहोत. वर्ल्ड कपमध्ये आम्ही जे केलं होतं त्याला दीड वर्ष होऊन गेलं आहे. आता पुन्हा एकत्र येऊन नव्यानं काम करण्याची गरज आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.
मोहम्मद शमी यानं एक ते दीड वर्ष क्रिकेट खेळलं नाही. इतक्या लवकर एखाद्याला जज करु नका.त्यानं 10 ते 12 वर्ष संघासाठी कामगिरी केली आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये त्यानं कशी कामगिरी केली आहे ते पाहा. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी झाली नसेल तर गोलंदाज खराब आहे असं नाही. आम्ही आता काय झालं ते पाहतो, पण दीर्घ काळापासून खेळाडूनं काय केलं ते पाहत नाही. आपण एखाद्या मालिकेत त्यानं कशी कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपमध्ये त्यानं कशी गोलंदाजी केली ते पाहिलं आहे. एकहाती मॅच जिंकवून दिल्या आहेत. पाच पाच विकेट मोहम्मद शमीनं घेतल्या, असं रोहित शर्मा म्हणाला.
रिषभ पंत की केएल राहुल?
एकदिवसीय सामन्यात केएल राहुल कित्येक वर्षांपासून विकेटकिपींग करत आहे. गेल्या 10 ते 15 मॅचमध्ये संघाला आवश्यक असलेली कामगिरी त्यानं केलेली आहे. रिषभ पंत देखील चांगली कामगिरी करतोय. दोघेही त्यांच्या बळावर मॅच जिंकवून देऊ शकतात. केएल राहुल की रिषभला घ्यायचं हा प्रश्न आहे. मागील कामगिरी पाहता त्यामध्ये सातत्य राखणं आवश्यक आहे. टीम म्हणून दोघांसोबत आहोत, असंही रोहितनं सांगितलं.
जसप्रीत बुमराह च्या स्कॅनिंगसंदर्भातील अपडेटसची वाट पाहतोय. येत्या काही दिवसात स्कॅनिंग झालं की आम्ही तुम्हाला त्यासंदर्भात माहिती देऊ, असं रोहित शर्मा म्हणाला.
वरुण चक्रवर्तीनं टी 20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यानं संघासाठी वेगळी कामगिरी टी 20 कामगिरी केली आहे. प्लॅन वर्क आऊट झाल्यास आम्ही त्याला खेळवण्याबाबत विचार करु, असं रोहित शर्मा म्हणाला.
इतर बातम्या :