Rohit Sharma Bowling In Nets : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात रोहित शर्मा तुफान फॉर्मात आहे. तीन सामन्यात एक शतक आणि एका अर्धशतकासह 200 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. आता पुण्यात रोहित शर्माने गोलंदाजीचा सराव केला आहे. बांगलादेशविरोधातील सामन्यासाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे. आज भारतीय संघाने सराव केला. यावेळी रोहित शर्माने फलंदाजीचा सराव केला. त्यानंतर गोलंदाजीही केली. नेट्समध्ये रोहित शर्माने गोलंदाजीचा सराव केला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 


गुरुवारी पुण्याच्या एमसीए मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये विश्वचषकातील सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल झाले आहेत.  भारतीय संघाने आज नेट्समध्ये घाम गाळला. रोहित शर्माने आधी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीचा कसून सराव केला. सराव सत्रात गोलंदाजी करतानाचा रोहितचा फोटो सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. या फोटवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. एका युजर्सने म्हटले की, बांगलादेशविरोधात पाच विकेट्स हॉल लोड होत आहे. तर अन्य एका युजर्सने विराट कोहलीची आठवण काढत म्हटले की,  “हम चाहते हैं कि हमारा राइट ऑर्म क्विक बॉलर भी ऐसा करे.” चाहत्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 






















दरम्यान, विश्वचषकाआधी पत्रकार परिषदेत गोलंदाजीबाबत विचारण्यात आले, तेव्हा रोहित शर्माने आपण गोलंदाजी करु शकतो, असे म्हणत हिंट दिली होती. पुण्यात रोहित शर्मा गोलंदाजी करणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 


रोहित शर्माचा गोलंदाजी रेकॉर्ड्स - 


रोहित शर्माने टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये गोलंदाजी केली आहे. कसोटीच्या 16 डावात त्याने दोन विकेट घेतल्या आहेत. वनडेमध्ये 38 डावात 8 विकेट घेतल्या आहेत. तर टी 20 मध्ये एक विकेट घेतली आहे. आयपीएलमध्ये सलग तीन विकेट घेण्याचा रेकॉर्ड्सही रोहित शर्माच्या नावावर आहे.