IND vs SA Rishabh Pant Statement News : कोलकातानंतर दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीमध्ये टीम इंडियाचा पुन्हा पराभव केला. पाहुण्या संघाने गुवाहाटीमधील दुसरा कसोटी सामना 408 धावांनी जिंकला. यासह दक्षिण आफ्रिकेने मालिका 2-0 अशी जिंकली. गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. धावांच्या बाबतीत, हा भारताचा सर्वात मोठा कसोटी पराभव आहे.

Continues below advertisement

गुवाहाटी कसोटीत भारताचे नेतृत्व करत असलेला विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत सामना संपल्यानंतर स्पष्टपणे निराश दिसला. त्याने या लाजिरवाण्या पराभवाबद्दल मोठं विधान करत संघाने अजून खूप सुधारणा करण्याची गरज असल्याचं सांगितलं.

भारताचा कर्णधार ऋषभ पंत काय म्हणाला? (What did India captain Rishabh Pant say?)

Continues below advertisement

ऋषभ पंत म्हणाला की, नक्कीच हा निकाल निराशाजनक आहे. पण एक संघ म्हणून आम्हाला अजून सुधारणा करायची आहे. दक्षिण आफ्रिका आमच्यापेक्षा चांगलं क्रिकेट खेळलं, याचं श्रेय त्यांनाच द्यायला हवं. अशा मालिकेत खूप विचार करत बसण्यापेक्षा शिकणं आणि संघ म्हणून एकत्र राहणं महत्त्वाचं असतं.

पुढे तो म्हणाला की, निश्चितच दक्षिण आफ्रिकाने या मालिकेत वर्चस्व गाजवले, पण क्रिकेटमध्ये काहीही गृहीत धरून चालता येत नाही. आम्ही घरच्या मैदानावर खेळत असलो, तरी मानसिकता स्पष्ट ठेवण्याची आवश्यकता आहे. सामन्यात काही क्षण असे होते जेव्हा आम्ही वरचढ होतो, पण त्या क्षणांचा फायदा आपण घेतला नाही. त्यामुळे आपल्याला याचा फटका बसला.

पंत शेवटी म्हणाला की, आगामी काळात नक्कीच आम्ही चांगलं खेळू, चुका समजून घेऊ आणि सुधारू. या मालिकेत काही महत्त्वाच्या टप्प्यांवर, विशेषतः फलंदाजीत, आपण संधी वाया घातल्या. संघ म्हणून त्या योग्य वेळी साधता आल्या नाहीत आणि त्यामुळे संपूर्ण मालिकेची किंमत मोजावी लागली. 

भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण काय?

दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे फलंदाजांची अत्यंत खराब कामगिरी. संपूर्ण मालिकेत भारताला चारही डावांत एकदाही 200 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताकडून या मालिकेत केवळ दोन खेळाडूंनी अर्धशतके झळकली. पहिले, कोलकाता कसोटीत यशस्वी जैस्वाल याच्या बॅटमधून आले, तर दुसरे, गुवाहाटी कसोटीत रवींद्र जडेजाने ठोकले. बाकी सर्व फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यामुळे भारताला दोन्ही सामन्यांत मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.

हे ही वाचा -

Gautam Gambhir On Resignation Ind vs SA 2nd Test मोठी बातमी: दोष सर्वांचा, पण सुरुवात माझ्यापासून; मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, राजीनाम्यावर गौतम गंभीरचं मोठं विधान