नवी दिल्ली : बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (T20 World Cup) भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताचं नेतृत्त्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) देण्यात आलेलं आहे. बांगलादेशनं देखील काही दिवसांपूर्वी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. बांगलादेशनं संघाचं नेतृत्त्व शाकिब-अल-हसन ऐवजी नजमूल हुसैन शांटो करणार आहे. शाकिब-अल-हसन याची निवड कप्तान म्हणून झालेली नसली तरी तो या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचणार आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि बांगलादेशचा प्रमुख खेळाडू शाकिब अल हसन या दोघांनी 2007 पासून प्रत्येक टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला आहे. रोहित शर्मा आणि शाकिब-अल-हसन यांनी 2007,2009,2010,2011,2014,2016,2021,2022 मध्ये सहभाग घेतला आहे. तर, 2024 च्या वर्ल्डकपसाठी दोघांची निवड झाली आहे.
रोहित शर्मा आणि शाकिब-अल-हसन हे दोघे यंदा नववा टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहेत. बांगलादेशचा महमदुल्लाह, डेविड वॉर्नर, मुस्तफिजूर रहमान हे तिघे आठवा टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहेत. ख्रिस गेल, डिवेन ब्रावो यांनी सात टी-20 वर्ल्ड कप खेळले आहेत.
बांगलादेश ड गटात
2024 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेश ड गटात आहे. बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँडस आणि नेपाळचा समावेश आहे.
भारत अ गटात
भारत आणि पाकिस्तान टी-20 वर्ल्डकपमध्ये अ गटात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 9 जूनला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यासह या गटात कॅनडा, अमेरिका आणि आयरलँडचा समावेश आहे.
दरम्यान, भारतानं 2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतरच्या सात स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. भारताकडे 17 वर्षानंतर पुन्हा विजेतेपद मिळवण्याची संधी आहे.
भारताचे सामने कधी?
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत अ गटात आहे. भारताची पहिली मॅच आयरलँड विरुद्ध 5 जून रोजी होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज मॅच भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज लढतीत भारत आणि पाकिस्तान 9 जूनला आमने सामने येणार आहेत.भारताची तिसरी मॅच यूएस विरुद्ध 12 जून आणि चौथी मॅच 15 जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे.
संबंधित बातम्या :