नवी दिल्ली : भारत (Team India) तीन टी 20 सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या (Sri Lanka Tour) दौऱ्यावर जाणार आहे. रोहित शर्मानं (Rohit Sharma) आंतराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. यामुळं बीसीसीआय, निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर कॅप्टन निवडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) उपकॅप्टन पद भूषवलं असल्यानं त्याचं नवा चर्चेत होतं. हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर असतानाच सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नावाची चर्चा सुरु झाली. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात कुणाला कॅप्टनपद मिळणार याबाबत उत्सुकता आहे. रोहित शर्मानं टी 20 च्या कॅप्टनपदासाठी सूर्यकुमार यादवच्या नावाला पसंती दिली असल्याची माहिती आहे. याशिवाय प्रशिक्षक गौतम गंभीर याची देखील सूर्यकुमार यादवच्या नावाला पसंती असल्याच्या चर्चा आहेत.
सूर्यकुमार यादवच्या नावाला रोहित शर्माची पसंती
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात सूर्यकुमार यादवनं टीम इंडिया तसेच मुंबई इंडियन्समध्ये क्रिकेट खेळलेलं आहे. भारतात पुढचा टी 20 वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे. 2026 च्या टी वर्ल्ड कपचा विचार करुन कॅप्टन निवडला जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्माची पसंती देखील सूर्यकुमार यादवच्या नावाला असल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय गौतम गंभीरनं देखील सूर्यकुमार यादवच्या नावाला पसंती दिल्याच्या चर्चा आहेत. आता बीसीसीआय, निवड समिती आणि प्रशिक्षक यांच्या एकत्रित बैठकीत कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ते पाहावं लागेल.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर देखील सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवण्याच्या बाजूनं आहेत. हार्दिक पांड्याचं नाव मागं का पडलं याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. यामध्ये 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपचा विचार करुन निवड समिती नवा कॅप्टन निवडण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याच्या दुखापतींचा विचार करता बीसीसीआय वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी देखील भारतीय संघाचं टी 20 क्रिकेटमध्ये यापूर्वी नेतृत्त्व केलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं 16 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये भारताला 10 मॅचेसमध्ये विजय मिळाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं 7 सामने खेळले आहेत. यामध्ये भारतानं 5 मॅचमध्ये विजय मिळवला तर दोन सामन्यांमध्ये पराभव झाला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सामने खेळले आहेत. आता बीसीसीआय कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :