Rohit Sharma Reacts on Bengaluru Pitch : डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ॲडलेड कसोटीत टीम इंडिया अवघ्या 36 धावांत आटोपली, जी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे. आता एका महिन्यानंतर टीम इंडियाला पुन्हा ऑस्ट्रेलियाला जायचे आहे पण त्याआधी टीम इंडिया अवघ्या 46 रन्सवर ऑलआऊट झाली. फरक एवढाच की यावेळी ही परिस्थिती भारतीय भूमीवर घडली आणि तीही न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांत गडगडला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने पाच विकेट्स घेतल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्माने आपल्या निर्णय चूकला असे मान्य केले.
बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्मा स्वतः पत्रकार परिषदेला आला. यादरम्यान त्याने आपली चूक मान्य करत खेळपट्टी वाचण्यात चूक झाल्याचे सांगितले. रोहित शर्मा म्हणाला, "आम्हाला वाटले की पहिल्या सत्रानंतर ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना जास्त मदत करणार नाही कारण तिथे जास्त गवत नव्हते. आम्हाला वाटले की ते सपाट असेल. हा चुकीचा निर्णय होता (निर्णय)) आणि मला खेळपट्टी नीट वाचता आली नाही.
टीम इंडियाच्या 46 धावांना प्रत्युत्तर देताना पाहुण्या संघाने तीन गडी गमावून 180 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा संघ आता 134 धावांनी पुढे आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा रचिन रवींद्र 22 धावांवर तर डॅरिल मिशेल 14 धावांवर नाबाद माघारी परतला. या दोघांमध्ये 26 धावांची भागीदारी झाली आहे. याआधी डेव्हन कॉनवेने भारतीय गोलंदाजांविरुद्ध तुफानी फटकेबाजी केली. मात्र, त्याचे शतक हुकले. कॉनवेने 105 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 91 धावा केल्या. याशिवाय टॉम लॅथमने 15 आणि विल यंगने 33 धावा केल्या.
कॉनवे आणि लॅथम यांच्यात पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली. यानंतर कॉनवेने दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. तिन्ही फिरकीपटूंनी भारतासाठी आतापर्यंत सर्व विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. याआधी न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 5 विकेट घेतल्या होत्या. युवा वेगवान गोलंदाज विल्यम ओ रुकीने चार बळी घेतले.
हे ही वाचा -