Ritika Sajdeh Emotions After Rohit Sharma Stand Inauguration Wankhede : टीम इंडियाचा वनडे कर्णधार रोहित शर्माने भारतीय क्रिकेटला अनेक चांगल्या आठवणी दिल्या आहेत. गेल्या 18 वर्षांपासून रोहितने जागतिक क्रिकेटमध्ये भारताची प्रतिष्ठा वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा रोहित हळूहळू त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे, तेव्हा त्याला असा सन्मान मिळाला आहे, जो केवळ भारतातच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही काही मोजक्या खेळाडूंना मिळाला आहे. 

Continues below advertisement

मुंबई क्रिकेट असोसिएशनने ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमचा एक स्टँड हिटमॅनला समर्पित केला आहे. 16 मे, शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर एका विशेष कार्यक्रमात रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की ते टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा अशा प्रकारे सन्मान करू इच्छितात.

वानखेडेवरील स्टँडला रोहित शर्माचे नाव अन् रितिकाला अश्रू अनावर 

शुक्रवारी, वानखेडे स्टेडियमवर एका विशेष कार्यक्रमात, एमसीएने रोहितच्या नावावर असलेल्या स्टँडचे उद्घाटन केले. यावेळी रोहितची पत्नी आणि पालकही त्याच्यासोबत उपस्थित होते. दरम्यान रितिका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. वानखेडेवरील स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्यात आल्यानंतर रितिकाला अश्रू अनावर झाले आणि हा गोड क्षण कॅमऱ्यात कैद झाला. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी एमसीए अध्यक्ष शरद पवार, एमसीएचे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि इतर अनेक अधिकारी आणि चाहते उपस्थित होते. विशेष म्हणजे स्टँडवरील पडदा उघडण्याचे बटण रोहितने स्वतः दाबले नाही तर हे शुभ कार्य त्याच्या पालकांच्या हातांनी पूर्ण केले.

टीम इंडियाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "मी दोन फॉरमॅटमधून निवृत्त झालो आहे, पण मी अजूनही एकाच फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्यामुळे खेळताना असा सन्मान मिळणे हे खूप खास आहे. आता 21 तारखेला जेव्हा मी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून खेळेन, तेव्हा माझे नाव स्टँडवर पाहणे खूप खास असेल." 

 

हे ही वाचा -

India Squad for England : आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी, पण श्रेयस अय्यरला टीम इंडियात मिळणार नाही जागा? इंग्लंड दौऱ्याआधी मोठी अपडेट