Rishabh Pant : भारतीय संघाचा (Team India) स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात (Rishabh Pant Accident) झाला. या अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे तो बराच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असून पुढील वर्षभर देखील मैदानात परतण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान या गंभीर दुखापतीतून पंत हळूहळू सावरत असून त्याने स्वत:चा एक लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो क्लचेसच्या आधारे अंगणात चालताना दिसत आहे. फोटोमध्ये (Rishabh Pant Latets Photo) त्याच्या उजव्या पायाला प्लॅस्टर लावल्याचं दिसून येत असून इतरी काही ठिकाणी पट्टी लावण्यात आल्याचं दिसून येत आहे.  पंतने स्वत:चे दोन फोटो पोस्ट केले असून या फोटोंना खास असं कॅप्शनही दिलं आहे. त्याने लिहिलं आहे की, एक पाऊल पुढे, एक पाऊल अधिक ताकदवर, एक पाऊल आणखी चांगलं. इंग्रजीत हे कॅप्शन देत त्याने एक प्रेरणादायी पोस्ट केल्याचं दिसून येत आहे. 


पाहा पंतचे लेटेस्ट फोटो-






रुरकीला जाताना झाला होता अपघात


ख्रिसमस सेलिब्रेट करून दुबईहून परतलेला ऋषभ पंत 30 डिसेंबरला दिल्लीहून रुरकीला जात होता. यादरम्यान त्याची कार मोहम्मदपूर जतजवळ दुभाजकाला धडकली आणि आग लागली. या भयानक अपघातात पंत गंभीर जखमी झाला. त्याला त्वरीत प्रथमोपचारासाठी रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. कार अपघातात ऋषभ पंतच्या कपाळावर दोन कट झाल्याची माहिती बीसीसीआयने मॅक्स हॉस्पिटलला दिली होती. त्याच्या उजव्या पायाचा लिगामेंटलाही गंभाररित्या इजा झाली होती.  याशिवाय पाय, पाठ, अंगठा आणि मनगटात खोली आहे. आता लिगामेंट ऑपरेशनमुळे पंत 6 ते 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकेशिवाय तो आयपीएल 2023 मधूनही बाहेर राहू शकतो. जर त्याने तंदुरुस्त होण्यासाठी अधिक वेळ घेतला तर पंत 2023 च्या विश्वचषकातूनही बाहेर राहू शकतो.


हे देखील वाचा-