T20 World Cup 2024 Rinku Singh : टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंमध्ये रिंकू सिंह याला स्थान मिळालं नाही. रिंकूची निवड न झाल्यामुळे अनेक चाहत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या. आजी-माजी खेळाडूंनीही रिंकू सिंह संघात हवा होता, अशी प्रतिक्रिया दिली. टीम इंडियाच्या 15 जणांच्या चमूमध्ये निवड न झाल्यामुळे रिंकू सिंह नाराज झाला होता. रिंकू सिंह याच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनातील खंत बोलून दाखवली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


मंगळवारी टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलदेरांची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली. 15 जणांच्या चमूमध्ये रिंकू सिंह याला संधी मिळाली नाही. मागील अनेक दिवसांपासून एक्स्पर्टकडून रिंकू सिंह याला 15 मध्ये संधी मिळेल, असा दावा केला जात होता. पण प्रत्येक्षात मात्र रिंकू याला संघात स्थान मिळाले नाही. रिंकू सिंह याला संघात स्थान न मिळाल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. त्याशिवाय समालोचक आणि एक्सपर्ट यांनीही आपलं मत नोंदवलं. रिंकू सिंह याला राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत पाठवलं जाणार आहे. म्हणजेच, जर एखादा फलंदाज दुखापतग्रस्त झाला तर त्याच्याजाही रिंकू सिंह याची वर्णी लागू शकते. रिंकू सिंह याला स्थान न मिळाल्यामुळे अनेक चाहत्याना राग आला. रिंकू सिंह याच्या घरीही नाराजीचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे. 






News24 सोबत बोलताना रिंकू सिंह याच्या वडिलांनी मनातील खंत बोलून दाखवली. त्याशिवाय रिंकूची निवड झाली म्हणून आम्ही जल्लोष केला होता. पण रिंकूला 15 जणांमध्ये संधी मिळाली नाही, त्याची खंत असल्याचं ते म्हणाले. टीम इंडियासाठी आम्ही खूश आहोत, असेही त्यांनी सांगितलं. रिंकू सिंह यांचे वडील म्हणाले की,  रिंकू सिंह याची निवड झाल्याचं समजताच आम्ही फटके फोडून जल्लोष केला. रिंकू सिंह विश्वचषकात प्लेईंग 11 मध्ये खेळणार असल्याचं आम्हाला वाटलं, त्यामुळे आमचा आनंद गगणात मावत नव्हता. पण रिंकूनं आईला फोन करुन 15 जणांमध्ये निवड झाली नसल्याचं सांगितलं. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. 15 जणांमध्ये निवड न झाल्यामुळे रिंकूही थोडाफार नाराज झालेला. पण टीम इंडियासोबत जाणार असल्याचं त्यानं सांगितलं. 


पाहा व्हिडीओ -