Ravindra Jadeja Team India : क्रिकेटर रवींद्र जाडेजाच्या घरात कौटुंबिक वाद उफाळला आहे. रवींद्र जाडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह यांनी सून रिवाबा हिच्यावर मोठे आरोप केले आहेत. त्याशिवाय रवींद्र जाडेजावरही नाराजी व्यक्त केली आहे. रवींद्र जाडेजासोबत माझं कोणतेही नातं नाही. त्याच्यावर रिवाबानं जादू केली आहे. तिला फक्त पैसे हवे असतात, असा आरोप अनिरुद्ध सिंह यांनी केला आहे. अनिरुद्ध सिंह यांच्या या आरोपाला रवींद्र जाडेजा याने ट्वीट करत उत्तर दिलेय. 

दैनिक भास्करनं रवींद्र जाडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह यांची मुलाखत छापली. त्यामध्ये अनिरुद्ध सिंह यांनी सून रिवाबा जाडेजावर खूप गंभीर आरोप केले आहेत. मुलाखतीनुसार, अनिरुद्ध सिंह यांचा रवींद्र जाडेजा आणि रिवाबा जाडेजा यांच्यासोबत कोणताही संबंध नाही. ते वेगळे राहतात त्याशिवाय रिवाबा हिच्यावर जादूटोणा केल्याचा आरोपही केला आहे.  

रवींद्र जाडेजाशी कोणताही संबंध नाही - 

माझा रवींद्र जाडेजा अथवा त्याच्या पत्नीसोबत कोणताही संबंध नाही. ते आम्हाला बोलवत नाहीत, अथवा आम्ही त्यांना बोलवत नाही. रवींद्र जाडेजाच्या लग्नानंतर दोन तीन महिन्यातच वादाला सुरुवात झाली. सध्या जामनगरमध्ये मी एकटाच राहतो. रवींद्र जाडेजा वेगळा राहतो. रविबाने त्याच्यावर काय जादू केली माहित नाही. माझा तर मुलगा आहे, मला खूप वाईट वाटतं. त्याचं लग्न झालं नसतं तर बरं झालं असतं. त्याला क्रिकेटर केले नसतं तर बरं झालं असतं. आम्ही या परिस्थितीमध्ये तर राहिलो नसतो, अशी खंत मीडियासमोर अनिरुद्ध सिंह यांनी व्यक्त केली. 

रवींद्र जाडेजाचं स्पष्टीकरण -  रवींद्र जाडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी मुलगा आणि सूनेवर गंभीर आरोप केले. तसेच रवींद्र जाडेजासोबत राहत नसल्याचेही त्यांनी सांगितलं. त्याशिवाय रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबावर गंभीर आरोप केले. वडिलांच्या आरोपावर रवींद्र जाडेजानं स्पष्टीकरण दिलेय. सोशल मीडियावर पोस्ट करत मुलाखतीतील सर्व मुद्दे खोटे आणि चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या सोशल मीडियावर लिहू शकत नाही. माझी पत्नी आणि मला बदनाम केले जातेय, असेही जाडेजानं म्हटलेय. 

आणखी वाचा :

टीम इंडियाला मोठा धक्का, महत्वाचा फलंदाज जायबंदी, तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता!