India vs New Zealand Champions Trophy 2025 Final Ravindra Jadeja retiring : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यादरम्यान एका फोटोमुळे सोशिल मीडियावर खळबळ उडाली आहे. खरंतर, न्यूझीलंडविरुद्धच्या जेतेपदाच्या सामन्यात विराट कोहलीने संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला मिठी मारली. तेव्हापासून असे म्हटले जात आहे की, अंतिम सामन्यानंतर जडेजा निवृत्त होईल. दोघांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच निवृत्तीचीही खूप चर्चा होत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विराटने जडेजाच्या दहा षटके संपल्यानंतर जाऊ मिठी मारली. म्हणूनच सोशल मीडियावर जडेजाच्या निवृत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. चाहते असा अंदाज लावत आहेत की, तो आता टीम इंडियाकडून खेळणार नाही. पण, या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल, कारण अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

रवींद्र जडेजा निवृत्त होणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण चाहत्यांनी हे मान्य केले आहे की हा त्याचा शेवटचा सामना आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने भारतीय अष्टपैलू खेळाडूचे इतके दिवस टीम इंडियासाठी खेळल्याबद्दल आणि चांगली कामगिरी केल्याबद्दल आभार मानले. चाहत्यांनी जडेजाला निवृत्तीसाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

अंतिम सामन्यात अद्भुत गोलंदाजी

रवींद्र जडेजा प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही त्याने आपली जबाबदारी चोख बजावली. जडेजाने किवी फलंदाजांना धावा काढण्याची एकही संधी दिली नाही. त्याने संपूर्ण सामन्यात कंजूष गोलंदाजी केली आणि १० षटकांत फक्त ३ च्या इकॉनॉमीने ३० धावा दिल्या. यादरम्यान, जडेजाने टॉम लॅथमची एक महत्त्वाची विकेटही घेतली. त्याने सामन्यातील शेवटचा चेंडू ४० व्या षटकात टाकला. यानंतर, कोहली त्याच्याकडे गेला आणि दोघांनीही एकमेकांना मिठी मारली.

हे ही वाचा : 

IND vs NZ Final : कुलदीप यादवच्या गुगलीत रचिन रवींद्र, केन विल्यमसन 'चारों खाने चित्त'; रोहित शर्माच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन व्हायरल