England vs India 3rd Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी लॉर्ड्सच्या मैदानात पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला, जेव्हा सामना काहीसा तणावपूर्ण झाला. रवींद्र जडेजा आणि ब्रायडन कर्स यांच्यात धाव घेताना शाब्दिक वाद झाला आणि क्षणभर मैदानावरचे वातावरण तापले. ही घटना ब्रायडन कर्सच्या ओव्हरमध्ये घडली.
झाले असे की, ब्रायडन कार्सच्या षटकात रवींद्र जडेजा ऑफ साईडवर शॉट मारून धावण्यासाठी धावला. यादरम्यान, जडेजा चेंडू पाहत धावत होता आणि कार्स त्याच्यामध्ये आला. दोघेही एकमेकांना धडकले. त्यावेळी कार्सने रवींद्र जडेजाला पकडलं. यावेळी कार्स पुन्हा जडेजाला काहीतरी म्हणाला. यानंतर, टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रागावला आणि तो संतापला. या प्रसंगानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने तत्काळ हस्तक्षेप करत दोघांनाही शांत केलं आणि सामना पुन्हा सुरळीत सुरू झाला. क्षणभरासाठी मैदानावर रंगलेला हा तणाव सामना अधिकच रंगतदार आणि नाट्यमय बनवणारा ठरला.
लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्याचा निर्णायक दिवस सुरू झाला आहे. लॉर्ड्सवर भारतीय संघ अडचणीत सापडलेला दिसत आहे. संघाने 112 धावांत आठ विकेट गमावल्या आहेत. नितीश रेड्डी आठव्या विकेट म्हणून बाद होताच पंचांनी लंच घेण्याचा निर्णय घेतला. नितीशने आठव्या विकेटसाठी जडेजासोबत 91 चेंडूत 30 धावांची भागीदारी केली. सध्या रवींद्र जडेजा 17 धावांवर नाबाद आहे. नितीश 13 धावा काढल्यानंतर ख्रिस वोक्सचा बळी ठरला. भारताला आता विजयासाठी आणखी 81 धावांची आवश्यकता आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या रूपात दोन फलंदाज शिल्लक आहेत.
आज भारताने चार विकेटवर 58 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. सहा विकेट शिल्लक होत्या. त्यावेळी राहुल क्रीजवर होता. सुरुवातीच्या सत्रात भारताने ऋषभ पंत (9 धावा), केएल राहुल (39 धावा) यांचे बळी गमावले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला खाते उघडता आले नाही. त्यानंतर नितीशही पॅव्हेलियनमध्ये परतला. आतापर्यंत जोफ्रा आर्चरने तीन विकेट घेतल्या आहेत, तर बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत. ख्रिस वोक्सने एक विकेट घेतली आहे.
हे ही वाचा -