Eng vs Ind 3rd Test Day-5 : चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव, जडेजाची मेहनत गेली पाण्यात, इंग्लंडचा 22 धावांनी विजय

Eng vs Ind 3rd Test News : एजबेस्टनवर मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया लॉर्ड्स जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.

किरण महानवर Last Updated: 14 Jul 2025 09:32 PM

पार्श्वभूमी

India vs England, 3rd Test, Day 5, Live Score : एजबेस्टनवर मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया लॉर्ड्स जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. लॉर्ड्स टेस्टचा पाचवा दिवस थरारक ठरणार आहे, कारण दोन्ही...More

चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव, जडेजाची मेहनत गेली पाण्यात, इंग्लंडचा 22 धावांनी विजय

इंग्लंडने भारताचा 22 धावांनी पराभव केला. सोमवारी लॉर्ड्स कसोटीच्या शेवटच्या दिवशी यजमान संघाने भारतीय संघाला 170 धावांवर गुंडाळले आणि सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. त्याआधी बेन स्टोक्सच्या संघाने लीड्स कसोटीत भारताचा पाच विकेट्सने पराभव केला. त्याच वेळी, भारतीय संघाने दुसरी कसोटी (एजबॅस्टन कसोटी) 336 धावांनी जिंकली.


लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 10 विकेट्सच्या मोबदल्यात 378 धावा केल्या. त्यांच्याकडून जो रूटने 104 आणि जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्सने 51 आणि 56 धावा केल्या. त्यानंतर भारतानेही 10 विकेट्सच्या मोबदल्यात 387 धावा केल्या. त्यांच्याकडून केएल राहुलने 100, ऋषभ पंतने 74 आणि रवींद्र जडेजाने 72 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडने 10 विकेट गमावून 192 धावा केल्या आणि भारतासमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले, जे भारतीय संघ साध्य करू शकला नाही आणि 170 धावांवर ऑलआऊट झाला.