Ravichandran Ashwin Warning England : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. हैदराबाद येथे (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) पहिला कसोटी सामना होणार आहे. त्यापूर्वीच भारताचा फिरकीपटू आर. अश्विन याने साहेबांना थेट इशारा दिला आहे. इंग्लंडच्या बॅझबॉलला टक्कर देण्यासाठी तयार असल्याचे अश्विन याने म्हटले आहे. 


मंगळवारी बीसीसीआयकडून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आर. अश्विन याला 2020-21 वर्षासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार सोहळ्यात अश्विन याने इंग्लंडच्या बॅझबॉल क्रिकेटवर मोठं वक्तव्य केले. बॅझबॉल क्रिकेटअधिक आक्रमक खेळण्यासाठी उत्तेजित करते पण त्यासाठी तयार आहे, असे अश्विन म्हणाला.  


पुरस्कार घेताना अश्विन म्हणाला की, "बॅझबॉल क्रिकेटअधिक आक्रमक खेळण्यासाठी उत्तेजित करते. असं क्रिकेट खेळायला मला आवडते. आक्रमक क्रिकेट खेळणं चांगलेय. पण मला कसं खेळायचं चांगले माहितेय. "


500 कसोटी विकेटसाठी फक्त 10 विकेटची गरज


कसोटी क्रिकेटमध्ये आर. अश्विन याने आतापर्यंत 490 विकेट घेतल्या आहेत. 500 विकेट पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त 10 विकेटची गरज आहे. इंग्लंडविरोधात अश्विन 500 विकेटचा टप्पा पार करेल. 






अश्विनचं कसोटी करिअर - 


आर. अश्विन याने 2011 मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 95 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 179 डावात गोलंदाजी करताना 23.69च्या सरासरीने 490 विकेट घेतल्या आहेत. 34 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत. तर 24 वेळा 4 विकेट घेतल्या आहेत. फलंदाजीतही त्याने योगदान दिलेय. 134 डावात 3193 धावा चोपल्या आहेत.  5 शतके आणि 14 अर्धशतकाचा समावेश आहे. 


राहुल द्रविडही बॅझबॉलवर बोलला - 


इंग्लंडने अति-आक्रमणाची बॅझबॉल प्रवृत्ती रूढ केली असली, तरी त्याला तशाच पद्धतीने उत्तर द्यायलाच हवे असे नाही. पण, म्हणून मैदानात आमचे फलंदाज मागे राहतील असेही नाही, अशी प्रतिक्रिया भारताचा कोच राहुल द्रविड यांनी व्यक्त केली.


इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया  -


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार









बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड. 


भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -  


पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)


आणखी वाचा :


केएल राहुल ऐवजी केएस भरत की ध्रुव जुरेल, विकेटकिपर कोण, प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळणार?


मोठी बातमी! विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा, आरसीबीच्या खेळाडूला मिळाली संधी!