Virat Kohli : क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणजे भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli). सध्या खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतकं विराटच्या नावावर आहेत. पण 2019 पासून विराटचा फॉर्म आधी सारखा राहिलेला नाही. त्याने नोव्हेंबर, 2019 पासून एकही शतक ठोकलेलं नाही. पण असं असतानाही त्याची या काळातील आकडेवारी पाहता आजही त्याचा खराब फॉर्म हा बऱ्याच खेळाडूंच्या फॉर्मपेक्षा अधिक दमदार आहे. तो अर्धशतकं झळकावतचं असतो. पण यानंतरही अनेक क्रिकेट तज्ज्ञ तसंच माजी क्रिकेटर विराटवर टीका-टिपणी करत असतात. आता पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतिफ यांनी तर अजब प्रतिक्रिया देत विराटचा खराब फॉर्ममागे भारताचे माजी कोच रवी शास्त्री जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
राशिद यांनी एका युट्यूब चॅनेलवर बोलताना विराटच्या फॉर्मबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी रवी शास्त्री यांनी विराटला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. लतीफ म्हणाले, ''रवी शास्त्री केवळ एक कॉमेंटेटर असताना त्यांना थेट कोच करण्याचा निर्णय योग्य नव्हता. अनिल कुंबळे सारखा दिग्गज खेळाडू कोच असताना रवी शास्त्रींना कोच करणं चूकीचं होतं. विराटचा फॉर्म खराब होण्यामागे हेच कारण आहे.''
आयपीएलमध्ये विराटचं सुमार प्रदर्शन
यंदाच्या आयपीएल हंगामात (ipl 2022) विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने 15 सामन्यात 22.73 च्या सरासरीने आणि 115.98 च्या स्ट्राईक रेटने 309 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 73 असून तो तीन वेळा शून्य धावा करुनही बाद झाला आहे.
हे देखील वाचा-
- ENG vs IND : ठरलं! इंग्लंड दौऱ्यासाठी रोहितसोबत सलामीला शुभमन गिल, बीसीसीआयने स्वत:च पोस्ट केला VIDEO
- ENG vs NZ : तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, अँडरसनच्या जागी नवा खेळाडू करणार डेब्यू
- ENG vs IND : इंग्लंडविरुद्ध कसोटीत भारतासमोर 'ही' दोन आव्हानं सर्वात अवघड, फलंदाजीत रुट तर गोलंदाजीत ऑली, पाहा आकडेवारी