Ranji Trophy 2022 Final Live Updates: दुसऱ्या दिवसांचा खेळ संपला, मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर

दिमाखदार सलामीनंतरही मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या Madhya (Pradesh vs Mumbai) पहिल्या दिवशी पाच फलंदाजांना गमावून फक्त 248 धावाच उभारता आल्या.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jun 2022 05:11 PM
Ranji Trophy 2022 Final: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर

Ranji Trophy 2022 Final Day 2: मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं मध्य प्रदेशला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.  मुंबईनं पहिल्या डावात  374 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मध्य प्रदेशच्या संघानं या सामन्यातील दुसऱ्या दिवसाअखेर एक विकेट्स गमावून 123 धावा केल्या आहेत. हिमांशू मंत्रीच्या रूपानं मध्य प्रदेशच्या संघाला पहिला धक्का बसलाय. तुषार देशपांडेच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू झाला. हिमांशूनं 50 चेंडूत 31 धावा केल्या. मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर आहे.

Ranji Trophy 2022 Final: शुभम शर्मा, यश दुबेनं मध्य प्रदेशच्या संघाचा डाव सावरला

मुंबईच्या संघाला 374 धावांवर रोखल्यानंतर मध्य प्रदेशचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. त्यानंतर तुषार पांडेनं हिंमाशू मंत्रीच्या रुपात मध्य प्रदेशच्या संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर शुभम शर्मा आणि यश दुबेनं संघाचा डाव सावरला. मध्य प्रदेशच्या संघानं आतापर्यंत 117 धावा केल्या आहेत. 

मध्य प्रदेशची धावसंख्या 100 पार

रणजी ट्राफीच्या फायनल सामन्यातील पहिल्या डावात मध्य प्रदेशच्या संघानं एक विकेट्स गमावून 100 धावांचा आकडा गाठलाय. दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात तुषार देशपांडेनं हिमांशूला आऊट करून मध्य प्रदेशला पहिला धक्का दिला. 


 

तुषार पांडेची भेदक गोलंदाजी, मध्य प्रदेशच्या हिमांशू मंत्रीला माघारी धाडलं

मुंबईच्या संघाला 374 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मध्य प्रदेशच्या संघाला पहिला धक्का बसलाय. तुषार पांडेनं मध्य प्रदेशचा सलामीवीर हिमांशू मंत्रीला (31 धावा) बाद केलं आहे. 

Ranji Trophy 2022 Final: मध्य प्रदेशची संयमी खेळी

Ranji Trophy 2022 Final: मुबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामातील अंतिम सामना खेळला जाणार जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबईच्या संघाला मध्य प्रदेशनं 374 धावांवर रोखलं. त्यानंतर मध्य प्रदेशचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलाय. सध्या प्रदेश प्रदेशचा संघ संयमी खेळी करताना दिसत आहे. 

Ranji Trophy 2022 Final: मध्य प्रदेशच्या पहिल्या डावाला सुरुवात

Ranji Trophy 2022 Final: मुबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामातील अंतिम सामना खेळला जाणार जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबईच्या संघाला मध्य प्रदेशनं 374 धावांवर रोखलं. त्यानंतर मध्य प्रदेशचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलाय. 

Ranji Trophy 2022 Final: मुंबईचा संघ  374 धावांवर ऑलआऊट!

Ranji Trophy 2022 Final:  मध्य प्रदेशविरुद्ध सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात मुंबईचा संघ 374 धावांवर ऑलआऊट झालाय. मुंबईकडून सर्फराज खाननं 134 आणि यशस्वी जैस्वालनं 78 धावांची खेळी केली आहे. 

Ranji Trophy 2022 Final: दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात; सर्फराज खान, तुषार देशपांडे मैदानात 

Ranji Trophy 2022 Final:  मुंबईच्या डावातील दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या संघानं लंच ब्रेकपूर्वी 351 धावांवर आठ विकेट्स गमावले होते. सर्फराज खान (119 धावा) आणि तुषार देशपांडे (6 धावा) सध्या क्रिजवर आहे. 

Ranji Trophy 2022 Final Live: मुंबईच्या सरफराज खानचं शतक

Ranji Trophy 2022 Final Live: मध्य प्रदेशविरुद्ध सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीतील अंतिम सामन्यात मुंबईच्या सरफराज खाननं शतक पूर्ण केलंय. 


 

Ranji Trophy 2022 Final Live: दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच मुंबईला दोन मोठे झटके, सरफराज खान क्रिजवर

Ranji Trophy 2022 Final Live: रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच मुंबईच्या संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. पहिल्या सत्रात शम्स मुलानी आणि तनुष कोटियनच्या रुपात मुंबईनं दोन विकेट्स गमावले आहेत. सध्या सरफारज खान क्रिजवर उपस्थित असून मुंबईचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. 


 

पार्श्वभूमी

Ranji Trophy 2022 Final Live Updates: दिमाखदार सलामीनंतरही मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या Madhya (Pradesh vs Mumbai) पहिल्या दिवशी पाच फलंदाजांना गमावून फक्त 248 धावाच उभारता आल्या. या डावात मुंबईचा यशस्वी जैस्वालनं (Yashasvi Jaiswal) 163 चेंडूत 78 धावांची खेळी केली. तर, कर्णधार पृथ्वी शॉनं (Prithvi Shaw) 79 चेंडूत 47 धावा केल्या. 


या सामन्यात मुंबईच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर संघाकडून सलामी देण्यासाठी  पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल मैदानात उतरले. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या पृथ्वी शॉला अनुभव अगरवालनं बाद करून माघारी धाडलं.


दरम्यान, यशस्वीनं संघाचा डाव सावरत खेळ पुढे नेला.  या सामन्यात अरमान जाफर 26 आणि सुवेद पारकरनं 18 धावांची खेळी केली. त्यानंतर यशस्वीही तंबूत परतला. अनुभवनेच त्यालाही बाद केलं. यशस्वीनंतर  हार्दिक टामोरेही 24 धावा करुन माघारी परतला. सध्या सरफराज खान 40 धावांवर भक्कम स्थितीत आहे. तर शम्स मुलीनीही 12 धावांवर खेळत आहे. मध्यप्रदेशकडून अनुभव अगरवाल आणि सारांश जैन यांनी प्रत्येकी दोन-दोन तर, कुमार कार्तिकेयनं एक विकेट घेतली आहे. 


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.