Quinton de Kock Retirement: टीम इंडियानंतर दक्षिण आफ्रिका संघानेही वनडे विश्वचषकासाठी आपल्या 15 जणांच्या शिलेदारांची निवड केली. स्टार विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक यालाही विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले. पण त्याचवेळी डिकॉक याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. क्विंटन डि कॉकच्या निर्णायानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर क्विंटनच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली आहे. भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकानंतर क्विंटन डि कॉक याने वनडेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
क्विंटन डी कॉकचा दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्का -
यंदाचा विश्वचषक भारतामध्ये होत आहे. हा रनसंग्राम 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर महाअंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअवर पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी संघाची निवड करण्याची आज अखेरची तारीख होती. टीम इंडियानंतर दक्षिण आफ्रिका संघानेही आपल्या 15 जणांच्या चमूची निवड केली. पण क्विंटन डि कॉक याने दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्का दिला आहे. विश्वचषकाच्या संघात डि कॉकला स्थान देण्यात आले होते. पण क्विंटन डि कॉक याने विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. डिकॉकच्या निर्णायानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीकडून याची पुष्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिका संघानेही सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे.
कसे राहिलेय क्विंटन डि कॉकचे करिअर -
क्विंटन डी कॉक जगभरातील विविध स्पर्धात्मक क्रिकेट स्पर्धेत खेळला आहे. डि कॉक याने दक्षिण आफ्रिकेसाठी 140 वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केलेय. त्याशिवाय 54 कसोटी आणि 80 टी 20 सामन्यात क्विंटन डि कॉक याने दक्षिण आफ्रिका संघासाठी प्रतिनिधित्व केलेय. क्विंटन याने 140 वनडे सामन्यात 5966 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 45 इतकी राहिली आहे. डिकॉकने वनडेमध्ये 17 शतके ठोकली आहेत. त्याशिवाय 29 अर्धशतकेही झळकावली आहेत. क्विंटन डि कॉक याने विश्वचषकानंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अचानक निवृत्तीचा फटका दक्षिण आफ्रिकेला बसू शकतो. डी कॉकने 2013मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले होते. हा त्याचा तिसरा आणि अखेरचा वनडे विश्वचषक असेल.
वनडे विश्वचषक 2023साठी दक्षिण आफ्रिका संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, हेन्रीच क्लासेन, सिसांडा मगाला, केशव महाराज, एडेन मार्करम, लुंगी एन्गिडी, डेविड मिलर, एन्रीच नॉर्किया, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वॅन दर दुसेन, जेराल्ड कोएट्जी.