Pooja Vastrakar Shares Image Mocking BJP Leaders : भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरच्या (Pooja Vastrakar) एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. पूजा वस्त्राकर हिच्या इन्स्टाग्रामवर नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप नेत्यांबद्दल एक पोस्ट करण्यात आलेली होती. ही पोस्ट डिलिट करत पूजाने माफीही मागितली. पण पूजा वस्त्रकर हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पूजा वस्त्रकर हिने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर भाजप नेत्याची खिल्ली उडवणारी पोस्ट केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांचा फोटो पोस्ट करत वसूली टायटन्स असं टायटलही दिले होते. पूजाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. अनेकांनी या पोस्टवर आपली मतं नोंदवली, काहींनी पूजाला जोरदार ट्रोल केले. त्यानंतर पूजाने ही पोस्ट डिलिट करत माफीही मागितली. त्याशिवाय या पोस्टबाबत तिने स्पष्टीकरणही दिले. 


पूजा वस्त्रकार हिने नेमकी पोस्ट काय केली ?


अष्टपैलू पूजा वस्त्रकार (Pooja Vastrakar) भारतीय महिला क्रिकेट संघातील महत्वाची सदस्य आहे. पूजाच्या इन्स्टाग्राम खात्यावरुन शुक्रवारी मोदी आणि भाजपची खिल्ली उडवणारी पोस्ट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांना त्या पोस्टमध्ये वसूली टायटन्स असं म्हटलं गेले. त्याशिवाय ईडी इम्पॅक्ट प्लेअर असल्याचेही टाकण्यात आले. या पोस्टनंतर पूजावर टीकेचा भडीमार झाला. पूजाने तात्काळ ही पोस्ट डिलिट केली, त्याशिवाय स्पष्टीकरणही दिले. पण तोपर्यंत ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. 




पूजा वस्त्रकार  हिच्या या पोस्टला काहींनी काँग्रेस समर्थनात असल्याचे म्हटले तर काहींनी भाजपचा विरोध असल्याचे सांगितले. पूजाने सोशल मीडियावर मोदींची खिल्ली उडवणारी पोस्ट डिलिट करत माफी मागितली आहे. पण तोपर्यंत ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांकडून यावर चवीने चर्चा होत आहे. 


पूजाचा माफीनामा, स्पष्टीकरण - 


पूजा वस्त्राकर हिने आपल्या दुसऱ्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले की, "माझ्या इन्स्टाग्राम खात्यावर एक आपत्तीजनक पोस्ट झाली आहे. माझा फोन माझ्यावजळ नव्हता, त्यावेळी ही पोस्ट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी खूप आदर करते. या पोस्टसाठी मी त्यांची मनापासून माफी मागत आहे."




मूळ पोस्ट कुठून आली ?


पूजा वस्त्रकार हिच्या खात्यावरुन मोदींची खिल्ली उडवणारी पोस्ट झाली. ती मूळ पोस्ट काँग्रेसच्या (Indian National Congress) इन्स्टाग्राम खात्यावरुन झालेली आहे. 27 मार्च रोजी काँग्रेसने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट केली होती. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या फोटोवर वसूली टायटन्स असे म्हटलेय.