Shreyasi Singh Selected in Paris Olympic : बिहारमधील भाजप आमदार श्रेयसी सिंह यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. नेमबाज श्रेयसी सिंह ऑलिम्पिकमध्ये भारताची शान वाढवण्यासाठी सज्ज आहे.  पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये शॉटगन ट्रॅप स्पर्धेत श्रेयसी सिंह यांची निवड झाली आहे. 17 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर श्रेयासी हिची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धेत श्रेयासी हिने पदकावर नाव कोरलेय. अर्जुन पुरस्काराने तिला नामांकितही कऱण्यात आलेय. ऑलम्पिकमध्ये खेळणारी श्रेयसी पहिली बिहारी आहे. 


बिहारमधील जमुई या विधानसभा मतदारसंघातून श्रेयसी आमदार आहे. 29 ऑगस्ट 1991 मध्ये नवी दिल्लीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. शूटर श्रेयसी या बिहारमधील राजघराण्यातील सदस्य आहेत. श्रेयसी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहेत.राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांची आई पुतुल सिंग याही खासदार राहिल्या आहेत. श्रेयसी यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या घराण्यातून मिळाला आहे. श्रेयसीने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून पदवी घेतली आणि त्यानंतर   फरिदाबादमधून एमबीएची पदवी घेतली.



शॉटगन ट्रॅप स्पर्धेसाठी निवड -


बिहारमधील जमुई विधानसभेच्या भाजप आमदार श्रेयसी सिंह यांची पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत शॉटगन ट्रॅप महिला स्पर्धेत खेळणार आहे.जमुईच्या भाजप आमदार आता ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी लक्ष्य भेदणार आहे. श्रेयासी यांनी याआधीही नेमबाजीत अनेक पदकावर नाव कोरलेय.  


आनंदाचे वातावरण 


पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जमुईच्या आमदार श्रेयसी सिंहची निवड झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. श्रेयसी सिंह यांनी 2014 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले होते. 2014 मध्येच  शगुन चौधरी आणि वर्षा वर्मन यांच्यासोबत इंचॉन येथील 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेत डबल ट्रॅप सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.


अर्जुन पुरस्काराने नामांकित - 


श्रेयसी सिंह यांनी  2018 मध्ये ऑस्ट्रेलिया राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यांना 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्रेयासी यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना जमुई या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत श्रेयासी यांनी विजय मिळवला होता.