Kamran Akmal announced Retirement : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने (Kamran Akmal) अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. कामरान अकमल मागील बऱ्याच काळापासून पाकिस्तान संघातून बाहेर होता. दरम्यान अकमल पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा भाग नसला तरी तो पाकिस्तान सुपर लीगसह इतर लीगमध्ये खेळत होता. पण आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कामरान अकमलने 9 नोव्हेंबर 2002 रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. ऑगस्ट 2010 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला.


2006 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण 


दुसरीकडे, जर आपण कामरान अकमलच्या टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने 28 ऑगस्ट 2006 रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना ब्रिस्टलमध्ये खेळला गेला. या यष्टीरक्षक फलंदाजाने 2 एप्रिल 2017 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला गेला.


कामरान अकमल 2017 पासून पाकिस्तान संघातून बाहेर


पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने 23 नोव्हेंबर 2002 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला गेला. मात्र, कामरान अकमल 2017 पासून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये दिसलेला नाही. या यष्टिरक्षक फलंदाजाने 2 एप्रिल 2017 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.


नवी जबाबदारी  


त्याचबरोबर क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कामरान अकमलकडे नवी जबाबदारी आली आहे. पाकिस्तान सुपर लीग संघ पेशावर झल्मीने कामरान अकमलला संघाचा फलंदाज सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलं आहे. पाकिस्तान सुपर लीग सुरू होण्यापूर्वी कामरान अकमल पेशावर झल्मी संघासोबत सुमारे एक आठवडा घालवणार आहे.


कामरान अकमलची कारकिर्द थोडक्यात


कामरान मलिक पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. मागील बऱ्याच काळापासून तो संघाबाहेर असला तरी तो एक स्टार खेळाडू म्हणूनच आजही ओळखला जातो. त्यानं पाकिस्तानसाठी अखेरचा कसोटी सामना ऑगस्ट 2010 मध्ये खेळला होता. तर, एकदिवसीय सामना 2017 मध्ये एप्रिल महिन्यात खेळला होता. त्यानं टी-20 क्रिकेटमध्येही पाकिस्तानच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अकमलनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार 236 धावा आणि कसोटी क्रिकेटमध्ये 2 हजार 648 धावा केल्या आहे. 


हे देखील वाचा-