Continues below advertisement

कराची : पाकिस्तान क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेवर 93 धावांनी कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आशिया कपमध्ये पाकिस्तानचा भारतानं सलग तीन वेळा पराभव केला होता. या पराभवानंतर पीसीबी आता सलमान आगाचं कर्णधारपद काढून घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सलमान आगाच्या जागी पाकिस्तानच्या टी 20 संघाचं कर्णधारपद अनुभवी ऑलराऊंडर शादाब खान याला दिलं जाऊ शकतं. आगामी टी 20 मालिकांसाठी शादाब खानला कर्णधार केलं जाण्याची शक्यता आहे.

शादाब खान यानं पाकिस्तानकडून 70 एकदिवसीय आणि 112 टी 20 सामने खेळले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला शादाब खानच्या खांद्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे.

Continues below advertisement

शादाब खान सध्या फिट असून तो पुढील महिन्यात पुनरागमन करु शकतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याला टी 20 संघाचा कॅप्टन केलं जाऊ शकतं. खांद्यावर सर्जरी होण्यापूर्वी तो उप कॅप्टन होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या विश्वसनीय सूत्रांच्या मते शादाब खान 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान श्रीलंकेविरुद् च्या मालिकेत तो पुनरागमन करेल. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपच्या निमित्तानं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड शादाब खानला कर्णधार करेल.

पाकिस्तानच्या संघानं सलमान आगाच्या नेतृत्त्वात आशिया कपमध्ये सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत भारताविरुद्ध पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता.

पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. पाकिस्ताननं पहिल्या कसोटीत 93 धावांनी विजय मिळवला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेल्या दक्षिण आफ्रिकेला पाकिस्ताननं पहिल्या कसोटीत पराभूत केलं.  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 2025- 2027 च्या सायकलच्या गुणतालिकेत पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे.

एकीकडे सलमान आगाकडे असणारं टी 20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद काढून घेण्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं 91 धावांची खेळी केली. आता पीसीबी खरंच सलमान आगाचं कर्णधार पद काढून घेणार का ते पाहावं लागेल.