PAK vs ENG : टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये चार सामन्याची टी20 मालिका सुरु आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पण दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानाच 23 धावांनी दारुण पराभ केला. तिसरा सामनाही पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आता चौथा अन् अखेरचा टी20 सामना निर्णायक आहे. पण या सामन्याआधी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान याला टीकेचा सामना करावा लागला. कॅमेऱ्यासमोरच एका चाहतीने त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यामध्ये एक महिला चाहती शादाब खान याच्यासोबत फोटो काढत आहे. फोटो काढताना शादाबला विचारलेल्या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काय दिसतेय ?
शादाब खान याच्यासोबत एका चाहत्याने फोटो काढला. त्याचवेळी एक महिला चाहती तिथे फोटो काढण्यासाठी आली. पण फोटो काढता काढता त्या महिलेने शादाब खान याला एक प्रश्न विचारला. त्याच शादाबकडे काहीच उत्तर नव्हते. महिलेने विचारले की, "तू इतके षटकार का खातोय ? प्लीज फॉर्ममध्ये परत ये" शाबाद खान याची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा चेहरा पडला होता.
इंग्लंडच्या फलंदाजांनी शादाबची केली धुलाई
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील चार सामन्याच्या मालिकेतील पहिला आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 183 धावांचा पाऊस पाडला. शादाब खान याने गोलंदाजी करताना खूपच धावा दिल्या. त्याने आपल्या पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या. तर दुसर्या षटकात त्याने 17 धावा दिल्या. तिसरं षटकं त्यानं शानदार टाकले, त्यामध्ये फक्त चार धावा खर्च केल्या. पण स्पेलच्या चौथ्या षटकात जोस बटलर आणि जॉनी बेअयरस्टो यांनी धावांचा पाऊस पाडला. या षटकात शादाब खान यानं 20 धावा खर्च केल्या. धावांची लूट केल्यामुळे शादाब खान ट्रोल झाला. शाबाद खान याने चार षटकात 55 धावा खर्च केल्या.
पाकिस्तानची तयारी नाहीच
विश्वचषकाच्या तयारीसाठी पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडचा दौरा केला. पण त्यांची तयारी झालीच नाही. पाकिस्तानने महिनाभरात तीन देशांसोबत टी20 मालिका खेळली. त्यांना न्यूझीलंडविरोधात घरच्या मैदानावर 2-2 अशी मालिका सोडावी लागली. आयर्लंडविरोधात 2-1 ने मालिका जिंकली. पण पहिल्या सामन्यात आयरिश संघाने पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे टीकाही झाली. इंग्लंडविरोधातही पाकिस्तानची अवस्था खराबच आहे.