On This Day: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना खेळला जाणार आहे. हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या मालिकेत भारत 2-1 नं पिछाडीवर आहे. यामुळं आजचा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं आहे. राजकोट येथे आजच्या दिवशी म्हणजेच 2009 मध्ये श्रीलंकाविरुद्ध खेळण्यात आलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागनं वादळी खेळी केली होती. तो दिवस क्रिकेट चाहत्यांच्या आजही लक्षात आहे. 


हायव्होलटेज सामन्यात तीन धावांनी विजय 
दरम्यान, 15 डिसेंबर 2009 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात राजकोट येथे एकदिवसीय सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात दोन्ही संघाच्या मिळून 825 धावा बनल्या होत्या. या हायव्होलटेज सामन्यात भारतानं तीन धावांनी विजय मिळवला होता. भारताकडून वीरेंद्र सेहवागनं 146 धावांची खेळी केली होती. तर, श्रीलंकेकडून दिलशाननं शतक ठोकलं होतं. 


सेहवागची वादळी खेळी
या सामन्यात सचिन तेंडूलकर 69 धावा करून बाद झाला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी मैदानात आला. धोनीसोबत वीरेंद्र सेहवागनं गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी दुसऱ्या विकेट्ससाठी 156 धावांची भागेदारी केली आणि संघाचा स्कोर 300 पार पोहचवला. परंतु, चनाका वेलेगेदराच्या गोलंदाजीवर सेहवागनं आपली विकेट्स गमावली. यानंतरच सेहवाग नावाचं वादळ थांबल. या सामन्यात सेहवागनं 102 चेंडूत 146 धावा केल्या. ज्यात 19 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात भारतानं 50 षटकात सात विकेट्स गमावून 414 धावा केल्या. 


हे देखील वाचा- 


Ranji Trophy 2022: यशस्वी जैस्वालनं ठोठावलं टीम इंडियाचं दार, सलग तिसऱ्या डावात झळकावलं शतक


IND vs SA: भारतासाठी आजही 'करो या मरो'चं! कधी, कुठे पाहणार सामना?


IND vs SA: भारत की दक्षिण आफ्रिका? टी-20 मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकार्ड