Ollie Robinson : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्स याच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. काऊंटी चॅम्पियनशीपच्या एका सामन्यात ओली रॉबिन्सने एका षटकात तब्बल 43 धावा दिल्या आहेत. काऊंटी चॅम्पियनशीपच्या 134 वर्षातील इतिहासातील हे सर्वात महागडे षटक म्हणून नोंद झाली आहे. हा लाजीरवाणा विक्रम ओली रॉबिन्सच्या नावावर जमा झालाय. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही दुसरी सर्वात महागडी ओव्हर ठरली आहे.
काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ओली रॉबिन्सन याने ससेक्सकडून खेळताना लाजीरवाणी कामगीरी केली. डावखुऱ्या ओली रॉबिन्सने काऊंटी मैदानात डिव्हिजन टू सामना खेळत होता. लीसेस्टशर विरोधात एक षटक पूर्ण करण्यासाठी ओली रॉनिन्सन यानं नऊ चेंडू फेकले, त्यामध्ये त्याने 43 धावा खर्च केल्या. ओली रॉबिन्सन यानं 2021 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं इंग्लंडकडून 20 कसोटी सामने खेळले आहेत. ओली रॉबिन्स सध्या काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्स संघाचा सद्सय आहे.
लुईस किम्बरने धू धू धुतले -
काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये लीसेस्टरशरकडून खेळणाऱ्या लुईस किम्बर याने ओली रॉबिन्सन याची धू धू धुलाई केली. त्यानं एका षटकात पाच षटकार ठोकले. त्याशिवाय तीन चौकारही लगावले. ओली रॉबिन्स याने या षटकात तीन चेंडू नो बॉल टाकले, त्या सर्व चेंडूवर किम्बर यानं षटकार ठोकले. लीसेस्टरच्या दुसऱ्या डावातील 59 वं षटक टाकण्यासाठी ओली रॉबिन्सन आला होता, त्यावेळी किम्बर 56 चेंडूमध्ये 72 धावा काढून खेळत होता. षटक संपले तेव्हा किम्बर याने 65 चेंडूमध्ये 109 धावांपर्यंत पोहचला होता.
इंग्लंडचा सर्वात महागडा गोलंदाज, जालीरवाण्या विक्रमाची नोंद -
लीसेस्टरशरने ससेक्सला 446 धावांचे आव्हान दिलेय. रॉबिन्सची किम्बर यानं धुलाई केली. दुसऱ्या बाजूला बेन कॉक्स यानं संयमी फलंदाजी केली. रॉबिन्सन याने आपल्या महागड्या षटकात 6, नोबॉलवर 6, 4, 6, 4, नोबॉलवर 6, 4, नोबॉलवर 6 आणि अखेरच्या चेंडूवर एक धाव काढली. दरम्यान, रॉबिन्सन इंग्लंडकडून सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरलाय. त्यानं इंग्लंडचा माजी गोलंदाज एलेक्स ट्यूडर याचा विक्रम मोडला. एलेक्स ट्यूडर याने आपल्या षटकात 38 धावा खर्च केल्या होत्या. 1998 मध्ये सरे विरुद्ध लंकाशर सामन्यात एंड्रयू फ्लिंटॉफ याने ट्यूडर च्या षटकात 38 धावा चोपल्या होत्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात महागडे षटक -
1990 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात महागडे षटक पाहायला मिळाले होते. न्यूझीलंडचा माजी ऑफ ब्रेक गोलंदाज वर्ट वेन्स याने 1989-90 मध्ये वेलिंग्टन आणि कँटरबरी यांच्यात झालेल्या शेल चषकात 77 धावा खर्च केल्या होत्या. वर्ट वेन्स यानं त्या षटकात 17 नो बॉल फेकले होते. वर्ट वेन्स न्यूझीलंडसाठी चार कसोटी आणि आठ वनडे सामना खेळलाय. वर्ट वेन्स याच्यानंतर क्रिकेटमधील सर्वात महागडे षटक ओली रॉबिन्स यानं फेकलेय.