IND Vs SL Live Score : वानखेडेवर भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज वानखेडेच्या मैदानावर आमनासामना होणार आहे. 2011 च्या विश्वचषकाची फायनल या दोन्ही संघामध्ये याच मैदानावर झाली होती.
भारताचा लंकेवर विजय.. सेमीफायनलमध्ये प्रवेश
मोहम्मद शामीचा पंजा, लंकेला नववा धक्का
लंकेला आठवा धक्का.. शामीने घेतली चौथी विकेट
मोहम्मद शामीने लंकेला दिला सातवा धक्का
श्रीलंकेला सहावा धक्का... शामीच्या लागोपाठ दोन विकेट्स
श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत परतलाय.
मोहम्मद सिराजने कुसल मेंडीसला अवघ्या एका धावेवर बाद केले. तीन धावांत लंकेचे चार फलंदाज तंबूत
मोहम्मद सिराजने समरवीक्रमाला तंबूचा रस्ता दाखवला... 2 धावांत श्रीलंकेला तिसरा धक्का बसलाय.
जसप्रीत बुमराहनंतर मोहम्मद सिराजने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. करुणारत्नेला सिरजने शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. 2 धावांवर लंकेला दुसरा धक्का
भारताने दिलेल्या 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर धक्का बसलाय. निसंका शून्यावर बाद
भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेची गोलंदाजी फेल ठरली. प्रत्येक गोलंदाजाला वानखेडे मार बसला. मधुशंका याने भारताच्या पाच फलंदाजांना बाद केले, पण त्याला मारही तितकाच बसला. मधुशंका याने 10 षटकात 80 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. चमिरा याने 10 षटकात 71 धावा खर्च करत एक विकेट घेतली. रजिता, मॅथ्युस, तिक्ष्णा यांना एकही विकेट मिळाली नाही.
अय्यर बाद झाल्यानंतर अखेरच्या 3 षटकात रविंद्र जाडेजाने चार्ज केला. जाडेजाने वादळी फलंदाजी करत भारताची धावसंख्या 350 पार नेली. जाडेजाने 24 चेंडूत 35 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने एक षटकार आणि एक चौकार मारला. जाडेजाने शामीसोबत 11 चेंडूत 22 धावांची महत्वाची भागिदारी केली.
IND Vs SL, Innings Highlights : विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी पाया रचला, तर श्रेयस अय्यरने याने चौकार-षटकार लगावत फिनिशिंग टच दिला. वानखेडेच्या मैदानावर भारताने निर्धारित 50 षटकांत 8 विकेट्सच्या मोबदल्यात 357 धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिल 92, विराट कोहली 88 आणि श्रेयस अय्यर 82 यांनी शानदार अर्धशतके ठोकली. श्रीलंकेकडून मधुशंका याने पाच विकेट घेतल्या. श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचे आव्हान मिळालेय.
भारताला सहावा धक्का बसला.. षटकार मारण्याच्या नादात श्रेयस अय्यर 82 धावांवर बाद झाला.
सूर्यकुमार यादव आणि राहुल यांना मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर फिनिशिंगची जबाबदारी असणारे हे दोन्ही फलंदाज लगेच तंबूत परतले. केएल राहुल याने 19 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 21 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादव याने 9 चेंडूत दोन चैकाराच्या मदतीने 12 धावा जोडल्या.
अय्यरचे विश्वचषकातील दुसरे अर्धशतक... वानखेडे मैदानावर 36 चेंडूत अर्धशतक ठोकले.
लोकेश राहुल बाद झाल्याने टीम इंडिला चौथा धक्का बसला आहे. चमीराने त्याला बाद केले. त्यामुळे भारताची 39.2 षटकात 4 बाद 256 अशी झाली.
लोकेश राहुल बाद झाल्याने टीम इंडिला चौथा धक्का बसला आहे. चमीराने त्याला बाद केले. त्यामुळे भारताची 39.2 षटकात 4 बाद 256 अशी झाली.
गिल आणि विराट लागोपाठ बाद झाल्यानंतर अय्यर-राहुलने डाव सावरला... भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकाने हुलकावनी दिली. विराट कोहली वानखेडेवर वनडेतील 49 वे शतक ठोकेल, अशीच सर्वांना आशा होती. पण लयीत असणाऱ्या विराट कोहलीला मधुशंकाने तंबूत पाठवले. विराट कोहलीने वानखेडेवर रुबाबदार सुरुवात केली होती. त्याने एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत दावसंख्या हालती ठेवली होती. शतकाच्या जवळ गेल्यानंतर विराट कोहलीची बॅट थोडी शांत झाली, अन् तिथेच श्रीलंकेच्या मधुशंकाने डाव साधला. मधुशंकाच्या गोलंदाजीवर विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीने 94 चेंडूत 88 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने 11 चौकार लगावले.
शुभमन गिलचे शतक थोडक्यात हुकले... शुभमन गिल 92 चेंडूवर 92 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन षटकार आणि 11 चौकार लगावले. भारत 2 बाद 193 धावा
शुभमन गिल आणि विराट कोहलीने लंकेला धू धू धुतले... दोघांनी आतापर्यंत 189 धावांचा पाऊस पाडलाय. दोघेही शतकाच्या जवळ पोहचले आहेत.
वानखेडेच्या मैदानावर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी लंकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरु केली आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 150 धावांची भागीदारी झाली आहे. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतकाकडे आगेकूच केली आहे.
विराट कोहलीनंतर शुभमन गिलने अर्धशतक ठोकले. शुभमन गिलने 55 चेंडूत अर्धशतक ठोकले.
वानखेडे मैदानावर विराट कोहलीने अर्धशतक ठोकलेय. विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकातील चौथे अर्धशतक होय.
विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी भारताचा डाव सावरला. दुसऱ्या चेंडूवर कर्णधार माघारी परतल्यानंतर दोघांनी भारताच्या डावाला आकार दिला. भारत एक बाद 97 धावा
वानखेडेच्या मैदानावर विराट कोहलीने सचिनचा विक्रम मोडलाय. वर्षभरात सर्वाधिक वेळा एक हजार धावांचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर आहे.
दुशमंता चमिराने विराट कोहली आणि शुभमन गिल यांची बॅट शांत ठेवली आहे. आतापर्यंत त्याने दोन षटके निर्धाव फेकली आहेत.
कर्णधार रोहित शर्माला मधुशंकाने बाद करत भारताला पहिला धक्का दिला...
दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, एंजेलो मॅथ्यूज, महीश तिक्षाना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा, दुशान हेमंता आणि दुष्मंता चमीरा
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
2023 World Cup, IND vs SL Toss Update : श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने वानखेडेच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. श्रीलंका संघाने भारताविरोधात एक बदल केलाय. धनंजय डिसल्वा याला आराम देण्यात आलाय. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम उतरवण्यात आला आहे.
भारताची प्रथम फलंदाजी
मोहम्मद शामाीने आज पाच विकेट्स घेतल्या तर विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होईल. झहीर खानच्या नावावर 44 विकेट्स आहेत. शामीच्या नावावर 40 विकेट्स आहेत.
वानखेडेवर थोड्याच वेळात होणार नाणेफेक
भारतीय संघाने आतापर्यंत स्पर्धेतील सहाही सामने एकतर्फी जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या तगड्या संघाचा पराभव केलाय. दुसरीकडे श्रीलंका संघाला सहा सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आलेत. त्यांचे गेल्या काही दिवसांतील कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. त्यात प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. अशा स्थितीत श्रीलंका संघाला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. दुसरीकडे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक वाढलेला आहे. स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी पाहाता वानखेडेवर भारतीय संघ विजय मिळवेल, असेच प्रत्येकाला वाटत आहे.
वेगवान गोलंदाजी असू किंवा फिरकी गोलंदाजी, भारतीय संघ श्रीलंकेपेक्षा वरचढ आहे. जसप्रीत बुमराहने यंदाच्या विश्वचषकात चेंडूने कमाल केली आहे. बुमराहने 14 विकेट्स घेतल्या आहेत. शामीने दोन सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजला विकेट मिळाल्या नाहीत, पण तो भेदक मारा करत आहे. कुलदीप आणि जाडेजापुढे दिग्गज फलंदाज फेल गेले आहेत. यंदाच्या विश्वचषकात भारताची गोलंदाजी सर्वात तगडी आहे. दुसरीकडे श्रीलंकाकडून फक्त दिलशान मदुशंका आणि कासुन राजिथा विकेट घेण्यात सरासरी कामगीरी केली आहे. पण इतरांना अपयश आलेय. फिरकी विभागातही निराशाच आहे.
दोन्ही संघाच्या फलंदाजीत जमीन आस्मानाचा फरक दिसत आहे. भारतीय संघाकडे तगडा अनुभव आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या अनुभवी फलंदाजाच्या जोडीला शुभमन गिल, श्रेयस अय्यर या युवा फलंदाजाची जोड आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी यंदाच्या विश्वचषकात धावांचा पाऊस पाडलाय. शुभमन गिल आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अय्यर आणि राहुलही फॉर्मात आहेत. सूर्या आणि जाडेजाही तळाला धावांचा पाऊस पाडू शकतात. त्यामुळे भारतीय संघाची फलंदाजी लंकेच्या तुलनेत तगडी आहे.
श्रीलंकेच्या फलंदाजीचा विचार केला तर फक्त तीन फलंदाजाची आतापर्यंत चांगली कामगिरी झाली आहे. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरेल आहेत. समरविक्रमा, निसंका आणि कुसल मेंडिस यांच्या बॅटमधून धावा निघाल्यात, पण असलंका, परेरा, डीसिल्वा अद्याप रंगात दिसले नाहीत.
वानखेडेवर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामने झाले आहेत. यामध्ये भारताने दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेला फक्त एकदा विजय मिळवता आलाय. दुसरीकडे विश्वचषकात दोन्ही संघ 9 वेळा आमनेसामने आलेत. यामध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी चार चार विजय मिळवले आहेत.
भारत आणि श्रीलंका संघामध्ये आतापर्यंत 167 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 98 सामन्यात विजय मिळवलाय. तर श्रीलंकेच्या संघाने 57 सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघातील 11 सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटला. वनडेतील श्रीलंकेविरोधात भारताची कामगीरी दमदार राहिली आहे. त्यामुळे आज बारतीय संघ विजयाचा दावेदार असेल.
मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर विश्वचषकातील दोन सामने झाले आहेत. दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी कताना 380 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आयपीएलमध्येही या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडत असल्याचे आकडेवारी सांगते. वानखेडेचे मैदान हायस्कोरिंग आहे. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस प्रत्येक संघाचा असतो.
दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, एंजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महीश तिक्षाना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा आणि दुष्मंता चमीरा
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना टिव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर सामना पाहता येईल. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी सह इतर भाषांमध्येही सामन्याचा आनंद घेता येईल. मोबईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन चार्ज लागणार नाही. फ्रीमध्ये या सामन्याचा आनंद घेता येईल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्यासंदर्भात सर्व माहिती वाचता येईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मागील पाच सामन्याचा निकाल एकतर्फी लागलाय. पाचही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आशिया चषकातही भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव केला होता.
भारत आणि श्रीलंका संघामध्ये आतापर्यंत 167 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 98 सामन्यात विजय मिळवलाय. तर श्रीलंकेच्या संघाने 57 सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघातील 11 सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटला.
विश्वचषकाच्या मैदानात भारत आणि श्रीलंका संघामध्ये नऊ वेळा आमनासामना झालाय. दोन्ही संघाने प्रत्येकी चार चार सामन्यात विजयस मिळवला आहे. एक सामना रद्द झाला होता.
मुंबईमध्ये आज पावसाची शक्यता थोडीही नाही. हवामान एकदम क्लिअर असेल. त्यामुळे सामन्यात पावसाचा कोणताही व्यत्यय येणार आहे. तापमान 29 डिग्रीच्या आसपास असेल.
वानखेडेची खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाजांना मदत करणारी आहे. मागील 20 वनडेचा विचार केल्यास पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 258 इतकी आहे. नाणेफेक जिंकणारा संघ या मैदानावर प्रथम फलंदाजी करेल.
पार्श्वभूमी
ODI World Cup 2023, IND Vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज वानखेडेच्या मैदानावर आमनासामना होणार आहे. 2011 च्या विश्वचषकाची फायनल या दोन्ही संघामध्ये याच मैदानावर झाली होती. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ वानखेडेच्या मैदानात भिडणार आहेत. लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलचे तिकिट जवळपास निश्चित केलेय. गुणतालिकेत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे श्रीलंका संघाने पाचपैकी तीन सामने गमावले आहेत. त्यांना फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. श्रीलंकेला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढील प्रत्येक सामन्यात विजय मिळवायचाच आहे. यंदाच्या विश्वचषकात अजय असणारा टीम इंडिया एकमेव संघ आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना रंजक होणार आहे. हेड टू हेड, पिच रिपोर्ट, वेदर अपडेट अन् बरेच काही जाणून घेऊयात....
वानखेडेवरचा रेकॉर्ड काय ?
मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर विश्वचषकातील दोन सामने झाले आहेत. दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी कताना 380 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आयपीएलमध्येही या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडत असल्याचे आकडेवारी सांगते. वानखेडेचे मैदान हायस्कोरिंग आहे. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस प्रत्येक संघाचा असतो.
IND vs SL, World Cup 2023: Pitch report
IND vs SL, World Cup 2023: Weather update
मुंबईमध्ये आज पावसाची शक्यता थोडीही नाही. हवामान एकदम क्लिअर असेल. त्यामुळे सामन्यात पावसाचा कोणताही व्यत्यय येणार आहे. तापमान 29 डिग्रीच्या आसपास असेल.
India vs Sri Lanka Head to Head in ODI World Cup
विश्वचषकाच्या मैदानात भारत आणि श्रीलंका संघामध्ये नऊ वेळा आमनासामना झालाय. दोन्ही संघाने प्रत्येकी चार चार सामन्यात विजयस मिळवला आहे. एक सामना रद्द झाला होता.
हेड टू हेड आकडे काय सांगतात ?
भारत आणि श्रीलंका संघामध्ये आतापर्यंत 167 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 98 सामन्यात विजय मिळवलाय. तर श्रीलंकेच्या संघाने 57 सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघातील 11 सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटला.
मागील पाच सामन्यातील काय निकाल लागला ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मागील पाच सामन्याचा निकाल एकतर्फी लागलाय. पाचही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आशिया चषकातही भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव केला होता.
लाईव्ह कुठे पाहाल ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना टिव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर सामना पाहता येईल. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी सह इतर भाषांमध्येही सामन्याचा आनंद घेता येईल. मोबईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन चार्ज लागणार नाही. फ्रीमध्ये या सामन्याचा आनंद घेता येईल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्यासंदर्भात सर्व माहिती वाचता येईल.
भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
श्रीलंका संघाची संभाव्य प्लेईंग 11 -
दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, एंजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महीश तिक्षाना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा आणि दुष्मंता चमीरा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -