IND Vs Nz Score : टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक! वरुण चक्रवर्तीच्या तालावर नाचले न्यूझीलंड, सेमीफायनलमध्ये 'या' संघाशी भिडणार

India vs New Zealand Score Update : आज ग्रुप अ मधील शेवटच्या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल. दोन्ही संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित आहेत.

किरण महानवर Last Updated: 02 Mar 2025 09:45 PM

पार्श्वभूमी

India vs New Zealand Champions Trophy 2025 Cricket Score : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडला हरवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 44 धावांनी...More

टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक! वरुण चक्रवर्तीच्या तालावर नाचले न्यूझीलंड, सेमीफायनलमध्ये 'या' संघाशी भिडणार

फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीमुळे भारताने अ गटातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला. गट टप्प्यात भारताची अपराजित मालिका सुरूच राहिली कारण संघाने तिन्ही सामने जिंकून गट अ मध्ये अव्वल स्थान मिळवले. आता 4 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. ऑस्ट्रेलियन संघ ग्रुप बी मध्ये दुसरे स्थानवर आहे.