Vijay Hazare Trophy 2022: तामिळनाडूचा तडाखेबाज फलंदाज एन जगदीशननं (N Jagadeesan) विजय हजारे ट्रॉफीमध्ये खास विक्रमाला गवसणी घातलीय. यंदाच्या हंगामात त्यानं आठ डावांत 830 धावांचा टप्पा गाठलाय. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात 830 धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.
अरूणाचल प्रदेशविरुद्ध विक्रमी खेळी
विजय हजारे ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात एन जनदीशनची बॅट चांगलीच तळपल्याची पाहायला मिळाली. यंदाच्या हंगामातील आठ डावात त्यानं 138.33 च्या सरासरीनं 830 धावा केल्या आहेत. ज्यात पाच शतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यानं सलग पाच सामन्यात पाच शतक झळकावण्याचा पराक्रम केलाय. अरूणाचल प्रदेशविरुद्धची खेळी त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी ठरली. या सामन्यात त्यानं 277 धावांची विक्रमी खेळी केली.
विराट कोहलीचा विक्रम मोडला
एन जदीशननं एका हंगामात सलग पाच शतकं झळकावून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा विक्रम मोडलाय. या कामगिरीसह तो एकाच हंगामात सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरलाय. 2008-09 च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहलीनं चार शतकं झळकावली होती. त्यांच्याशिवाय पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल यांनीही एका हंगामात प्रत्येकी चार शतकं झळकावली आहेत. या सर्व फलंदाजांना मागं टाकत जगदीशननं यंदाच्या हंगामात पाच शतकं ठोकली आहेत.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग पाच शतकं झळकावणारा पहिला फलंदाज
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग पाच शतके झळकावणारा जगदीशन जगातील पहिला फलंदाज ठरला. जगदीशनच्या आधी कुमार संगकारा, देवदत्त पदीकल आणि एल्विरो पीटरसन यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग 4-4 शतकं झळकावली होती.
एन जगदीशनची विजय हजारे ट्रॉफीमधील कामगिरी
डाव– 8
धावा– 830
सरासरी– 138.33
शतक– 5
सर्वोच्च धावसंख्या– 277
हे देखील वाचा-