Mumbai vs Vidarbha Final, Ranji Trophy Day 3, Highlights:  युवा मुशीर खान याचं झंझावती शतक आणि श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांची जिगरबाज अर्धशतकाच्या बळावर मुंबईने रणजी चषकाच्या फायनलवर पकड मजबूत केली आहे. मुंबईने रणजी चषकाच्य फायनलमध्ये विदर्भापुढे 538 धावांचे आव्हान ठेवलं होतं. मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावांचा डोंगर उभारला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थंबला तेव्हा विदर्भानं बिनबाद 10 धावा केल्या आहेत. मुंबईकडून दुसऱ्या डावात मुशीर खान यानं संयमी शतक ठोकलं. त्याला अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली साथ दिली. 


मुंबईने 42 व्या रणजी चषकाच्या विजयाकडे वाटचाल केली आहे. मुंबईने विदर्भापुढे विजयासाठी 538 धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवलेय. चौथ्या दिवशी खेळपट्टीवर फिरकीला मदत मिळेल असा अंदाज आहे. मुंबईकडे एकापेक्षा एक दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे रणजी चषकावर जवळपास मुंबईने नाव कोरल्यात जमा आहे. 






तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाल्यानंतर अजिंक्य रहाणे यानं आक्रमक फलंदाजी सुरुवात केली. अजिंक्य रहाणे आक्रमक फलंदाजी करत असताना मुशीर खान संयमी फलंदाजी करत होता. तर अजिंक्य रहाणे  आणि मुशीर खान यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली. त्याशिवाय मुशीर आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्येही शतकी भागिदारी झाली. श्रेयस अय्यरनं 95 धावांचे योगदान दिले. तर अजिंक्य रहाणे यानं 73 धावांची खेळी केली. मुशीर खन यानं संयमी 136 धावा केल्या. अखेरीस सॅम्स मुलनं यानं अर्धशतकी योगदान दिलं.  विदर्भाकडून हर्ष दुबे यानं 5 विकेट घेतल्या. तर यश ठाकूर यानं दोन फलंदाजांन तंबूत धाडलं.