Mumbai's squad Ranji Trophy semi-final against Vidarbha : भारतीय संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालला सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले होते, परंतु त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी अंतिम संघ जाहीर झाला, तेव्हा वरुण चक्रवर्तीचा मुख्य संघात समावेश करण्यात आला. तिथे त्याला नॉन-ट्रॅव्हलिंग रिझर्व्हवर ठेवण्यात आले. याचा अर्थ तो 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघासोबत जाणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर जैस्वालचा रणजी ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला.

मुंबईकडे स्टार खेळाडू

आता यशस्वी जैस्वालच्या समावेशामुळे मुंबई संघाला पुन्हा मोठा बदल करावा लागेल, त्याच्यामुळे फलंदाजी आक्रमणाला चालना मिळेल. त्याच्याकडे तुफानी कामगिरी करण्याची क्षमता आहे. तर मुंबईकडे आधीच स्टार खेळाडू आहेत. यामध्ये कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर सारखे खेळाडू आहेत. जैस्वालने या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्ध फक्त एकच सामना खेळला, ज्यामध्ये तो फक्त 4 आणि 26 धावा करू शकला. या सामन्यातही मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय पदार्पण

यशस्वी जैस्वालने नुकतेच इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले, परंतु पहिल्या सामन्यात तो चांगली कामगिरी करू शकला नाही आणि 22 चेंडूत फक्त 15 धावा काढू शकला. तर त्याची प्रथम श्रेणी कारकीर्द चमकदार राहिली आहे. आतापर्यंत त्याने 36 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 3712 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 13 शतके आणि 12 अर्धशतके त्याच्या बॅटमधून आली आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याने 33 सामन्यांमध्ये एकूण 1526 धावा केल्या आहेत.

17 फेब्रुवारीपासून मुंबईचा सामना विदर्भाविरुद्ध 

मुंबई संघाला 17 फेब्रुवारीपासून विदर्भाविरुद्ध रणजी ट्रॉफीचा उपांत्य सामना खेळायचा आहे. कोलकाता येथे झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईने हरियाणाला 152 धावांनी हरवले होते. आता मुंबईला उपांत्य फेरीत विदर्भाकडून आव्हान मिळण्याची पूर्ण आशा आहे.

मुंबई संघ - अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघा भटकळ, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.

हे ही वाचा -

Yesha Sagar : पाहुण्यांसोबत जेवायला बसली नाही म्हणून फ्रेंचाइजी मालकाने नोटीस बजावली, मॉडेल-अँकर येशा सागरसोबत बांगलादेशमध्ये काय घडलं?