MS Dhoni Video : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सध्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) बाईक्सवरचे प्रेम सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच त्याच्याकडे एकाहून एक क्लासिक बाईक्ससह सुपरबाईक्स देखील आहेत. दरम्यान धोनीने आयपीएलच्या आगामी IPL 2023 हंगामासाठी सराव सुरू केला आहे आणि त्याचसाठी तो तो त्याच्या TVS Apache RR310 बाईकवरुन रांची स्टेडियमवर पोहोचला असून त्याचा हा बाईक रायडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


धोनी बऱ्याच दिवसांनंतर बाईक राईड करताना दिसला असून यावेळी त्याने हेल्मेटही घातलं होतं. बाईकचे हे मॉडेल BMW आणि TVS या कंपन्यांनी संयुक्तपणे बनवलं आहे. बाईकबद्दल बोलायचं झालं तर ही बाईक 313 सीसी इतक्या पॉवरची आहे, ज्यामध्ये सिंगल सिलेंडर व्यतिरिक्त लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. ही बाईक त्याच्या इंजिनमुळे इतर बाईक्सपेक्षा खूप वेगळी आहे. ही बाईक केवळ 7.13 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते. महेंद्रसिंग धोनीच्या बाईकच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर यामाहाच्या RD 350 व्यतिरिक्त त्याच्याकडे RX 100 देखील आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे Suzuki Shogan, Harley Davidson Fatboy आणि Kawasaki Ninja ZX-14R या बाईक देखील आहेत.


पाहा VIDEO-






धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम?


आयपीएल 2023 चा हंगाम महेंद्रसिंग धोनीच्या व्यावसायिक क्रिकेटचा शेवटचा हंगाम असू शकतो. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर धोनी फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. गेल्या मोसमात त्याने आधी रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपद सोपवलं होते, पण संघाची कामगिरी पाहता तो हंगामाच्या मध्यावर पुन्हा ही जबाबदारी पार पाडताना दिसला. आता सर्वांच्या नजरा आगामी आयपीएल सीझनकडे लागल्या आहेत जिथे धोनीची टीम पुन्हा त्याच जुन्या शैलीत खेळताना दिसणार आहे. आयपीएल 2023 च्या सीझनमध्ये बेन स्टोक्स देखील चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळताना दिसणार आहे, त्यामुळे यावेळी संघ खूप मजबूत दिसत आहे.


IPL 2023 मध्ये मैदानात दिसणार धोनी


एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता जवळपास 3 वर्षे उलटली आहेत. तरीही त्याची फॅन फॉलोइंग आजही तितकीच आहे. तसंच त्याने अजूनही आयपीएलमध्ये खेळणं सुरूच ठेवले आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार म्हणून धोनी अजूनही मैदान गाजवतो. दरम्यान, आयपीएल 2023 मध्येही तो खेळण्याची पूर्ण शक्यता आहे. या मोसमातही चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद त्याच्याकडेच असणार आहे.


फलंदाजीसह यष्टीरक्षणाचा सराव सुरू


धोनी सध्या आयपीएल व्यतिरिक्त कोणतंही क्रिकेट खेळत नाही. पण तो नियमितपणे फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सराव करत असतो. झारखंडमधील जेएससीए स्टेडियममध्ये तो घाम गाळताना दिसत असतो. याशिवाय टेनिस, बॅडमिंटन आणि इतर खेळातूंनही तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवत आहे.


हे देखील वाचा-